भारतीय आयुर्वेद सातासमुद्रापार * केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या आयुष मंत्रालयाने 16 देशांसोबत केली व्दिपक्षीय चर्चा आणि सामंज्यस करार

भारतीय आयुर्वेद सातासमुद्रापार
 * केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या आयुष मंत्रालयाने 16 देशांसोबत केली व्दिपक्षीय चर्चा आणि सामंज्यस करार
* पारंपारीक वैद्यक शास्त्राला चालना दिल्याबद्दल डब्ल्युएचओ ने व्यक्त केली भारताविषयी कृतज्ञता

बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
           दुसऱ्या जागतिक पारंपारीक औषध परीषदेत भारताने 16 देशांसोबत व्दिपक्षिय बैठका घेऊन, सामंज्यस करार, करुन पारंपारीक औषध क्षेत्रात आपले नेतृत्व अधिक मजबुत केले आहे. जागतिक स्तरावर पारंपारीक, पुरक आणि एकात्मिक वैद्यीक शास्त्राला चालना दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ.ट्रेडोस अधानोम गेब्रेयसस यांनी आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली.

           नवी दिल्ली येथे 17 ते 19 डिसेंबर दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने दुसरी पारंपारीक औषध शिखर परीषद दिल्ली येथे संपन्न झाली. या परीषदेमध्ये विज्ञान, संशोधन, गुंतवणूक, नवोपक्रम, सुरक्षा,नियम आणि आरोग्य प्रणालीच्या एकात्मतेवर सांगोपांग करण्यात आली. लोक केंद्रीत जागतिक आरोग्य परीषदेमध्ये पारंपारीक औषध प्रणालीत एक प्रमुख योगदान दिल्याबद्दल भारताचे महत्व पुन्हा अधोरखीत झाले.
           केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी नेपाळ, श्रीलंका, मायक्रोनेशिया, मॉरीशस, आणि फिजी या देशांच्या शिष्ट मंडळासोबत व्दिपक्षीय चर्चा केली. तर आयुष मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांनी ब्राझील, मलेशिया, नेपाळ, श्रीलंका, मायक्रोनेशिया, मॉरीशियस, फिजी,केनिया, संयुक्त अरब अमिराती, मेक्सिको, व्हिएतनाम, भूतान, सुरीनाम, थायलंड, घाना आणि क्युबा या 16 देशांच्या शिष्टमंडळासोबत व्दिपक्षीय बैठका पार पडल्या. भारत आणि क्युबा देशात आयुर्वेदा संदर्भांत सामंज्यस करारालाही मुदतवाढ देण्यात आली. आयुर्वेदामध्ये अभयासक्रम, विकास, सार्वजनिक आरोग्य एकत्रिकरण, पंचकर्म प्रशिक्षण आणि नियमात सुसंगतता आणून सहकार्य वाढविण्यासाठी एक संयुक्त कार्य गटाची स्थापना करण्यात आली.
        आस्ट्रेलिया, मारोस्को, इराण्, युगांडा, कॅनडा, स्विर्त्झ्लंड, अमेरीका, ब्रिटन, कोलंबिया, ब्राझील, न्युझिलंड, जर्मनी, नेपाळ, दक्षिण कोरीया आणि श्रीलंका व भारतातील आयुर्वेद तज्ञांनी या परीषदेमध्ये आपले अनुभव आणि विचार मांडले. त्यामुळे जागतिक स्तरावर पारंपारीक औषध प्रणालीच्या लवचिक आरोग्य व्यवस्था, जैवविविधता, व्यवस्थापन आणि सर्वसमावेशक विकासासाठी एक महत्वाच पाऊल या पारंपारीक औषध परीषदेमध्ये उचलण्यात आले. या पारंपारीक औषध परीषदेमध्ये सामुहीक जागतिक वचनबध्दतेसाठी आयुर्वेदाने एक मजबुत पाया रचला आहे.