मॉडेल डिग्री कॉलेजची विद्यार्थिनी कु.पुनम बंगाळेची राज्यस्तरावरील क्रिडा स्पर्धेसाठी निवड

मॉडेल डिग्री कॉलेजची विद्यार्थिनी कु.पुनम बंगाळेची राज्यस्तरावरील क्रिडा स्पर्धेसाठी निवड
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          नुकतीच झालेल्या 'अंतरविद्यापीठ' (Inter-University) स्तरावरील मैदानी क्रीडा स्पर्धेत बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजची विद्यार्थिनी कु. पूनम बंगाळे हीने रनिंग रेस या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याने तिची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

           संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ स्तरावर नुकत्याच क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्यात धावण्याच्या विविध शर्यतीमध्ये बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजची विद्यार्थिनी कु.पूनम बंगाळे हिने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे  नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली आहे.   कु.पूनम बंगाळे हिच्या निवडी बद्दल मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये तिच्या सत्काराचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता, यावेळी महाविद्यालयाचे मानद संचालक डॉ.अण्णासाहेब महळसने यांनी पूनम पुष्पगुच्छ देऊन कौतुक केलं यावेळी डॉ.किसन वाघ, क्रीडा प्रमुख प्रा.सुनीता गायकी, प्रा.किशोर बुलकडे उपस्थित होते. कु.पुनम हिने आपली जिदद, मेहनत , चिकाटीच्या बळावर ही कामगिरी साध्य केली असून महाविद्यालयाला तिचा अभिमान वाटत असल्याचे सांगीतले तर सत्कारला उत्तर देतांना कु.बंगाळे हीने अंतरविद्यापीठस्तरावर  शर्तीचे प्रयत्न करून महाविद्यालयाचे नाव उंचावण्यासाठी ग्वाही दिली .