जागतिक बौद्ध धम्म परिषदेत अकरा रत्नांना मूकनायक पुरस्काराने गौरविणार* शनिवारी पुरस्कार वितरण सोहळा

जागतिक बौद्ध धम्म परिषदेत अकरा रत्नांना मूकनायक पुरस्काराने गौरविणार
* शनिवारी पुरस्कार वितरण सोहळा

बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        मूकनायक फाउंडेशनच्या वतीने शनिवार २२ नोव्हेंबरला बुलढाणा येथे पार पडणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत विविध क्षेत्रात जिल्ह्याचे नाव उंचविणाऱ्या अकरा गौरवशाली व्यक्तीमत्वांना मूकनायक फाउंडेशन पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

         जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरु पूज्य भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांच्यासह भन्ते उदितज्ञान थेरो, भन्ते ज्ञानरक्षित थेरो, भन्ते यश थेरो, भन्ते धम्मसेन थेरो, भन्ते पुण्ण, भन्ते वेण धम्म चेती, भन्ते गुणानंद अभिभू यांच्या विशेष उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त गजानन घिरके, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त मनोज मेरत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा उपनिबंधक गीतेशचंद्र साबळे, ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
       जागतिक धम्म परिषद आणि पुरस्कार वितरण सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक सतीश पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 

*  धम्म परिषदेतील विशेष सत्कारमूर्ती

       जिल्हाधिकारी अर्चना वानखेडे, सामाजिक न्याय विभागाचे अमरावती विभागीय आयुक्त विजय साळवे, उद्योजक अमोल हिरोळे, बुलढाणा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. कैलास झिने, सामाजिक व शिक्षण क्षेत्रात योगदान देणारे भीमराव जाधव, ज्येष्ठ साहित्यिक सागर जाधव, प्रशासन व समाजकार्य करणारे भीमराव मुगदल, सैन्य दलाचे सुभेदार श्रीराम जाधव, भारतीय डाक विभागाचे आशिष इंगळे, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ आराख यांना मूकनायक फाउंडेशन पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. तसेच उत्तम प्रशासक व सामाजिक सेवा कार्य करणारे बी. ओ. बोर्डे यांना मरणोपरांत हा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.