* राज्यात सरसकट कर्जमाफी करा ; शिवसेनेचे (उबाठा) पालकमंत्र्यांना निवेदन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, तसेच राज्यात सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्यावतीने २६ सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्ह्यात अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पाऊस आणि सलग पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची उभी शेती उद्ध्वस्त झाली. जनावरांसाठी चारा, शेतकऱ्यांसाठी उदरनिर्वाह यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच राज्यात सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली.
निवेदन देतांना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, प्रवक्ता जयश्रीताई शेळके, गजानन वाघ, सहसंपर्कप्रमुख छगन मेहेत्रे, सहसंपर्कप्रमुख वसंत भोजने, जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके, डी. एस. लहाने, सुमित सरदार, लखन गाडेकर, आशिष रहाटे, गजानन ठोसर, विलास सुरडकर, तुकाराम काळपांडे, गजानन धांडे, सुनील घाटे, विजय इतवारे, राजेंद्र वाघ, संतोष दांडगे, विजय किसन धोंडगे, श्रीराम खिलदार, दीपक चांभारे, आत्माराम शेळके, ईश्वर पांडव, अशोक गव्हाणे, नारायण हेलगे, जिल्ह्यातील शहर प्रमुख उपतालुका प्रमुख व सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.