राजर्षी शाहू मल्टिस्टेटची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

राजर्षी शाहू मल्टिस्टेटची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीची १२ वी वार्षिक‎ सर्वसाधारण सभा २८ सप्टेंबर रोजी तालुक्यातील वरवंड येथे‎ उत्साहात पार पडली.‎

       प्रारंभी राजर्षी शाहू परिवाराचे आधारवड भाऊसाहेब शेळके, संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके, संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके, संचालक मंडळातील सदस्य, ठेवीदार, खातेदार, सभासद यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. सभेसमोर आलेल्या ठरावांवर चर्चा करुन सर्वानुमते मंजूर करण्यात आले. चालू आर्थिक वर्षात उत्कृष्ट व्यवसाय आणि कामकाज करणाऱ्या विभागाची निवड करण्यात आली. तसेच उत्कृष्ट व्यवस्थापकांना सन्मानित करण्यात आले. 
        अध्यक्षस्थानावरून बोलतांना संदीपदादा शेळके यांनी संस्थेच्या प्रगतीचा‎ आढावा घेतला. भविष्यातील ध्येयधोरणे व नियोजन याबाबत भूमिका मांडली. संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.  

         याप्रसंगी राजर्षी शाहू मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष विजय महाजन, संचालक राम लोखंडे, दीपक गायकवाड, श्याम सावळे, पृथ्वीराज राजपूत, संचालिका छायाताई शेळके, सुनंदाताई सोळंकी, माजी सरपंच सारंगधर सावळे, पांडुनाना बरडे, मुरलीधर जेऊघाले, बाळाभाऊ देशमुख, सुनिल सोळंकी, सुधाकर काळे , सुधाकर सावळे, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक दिलीप खरात आदींची उपस्थिती होती. संचलन विभागीय व्यवस्थापक गोविंद येवले यांनी केले तर आभार सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण यांनी मानले. 
* चिमुकल्या गार्गीने वेधले लक्ष : 

     राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संदीपदादा शेळके यांची कन्या गार्गीने सर्वांचे लक्ष वेधले. दहा वर्षांच्या गार्गीचे स्टेज डेअरिंग कौतुकाचा विषय ठरला. तसा संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमात तिचा सहभाग असतो. हसत खेळत सर्वांशी मनमोकळेपणाने संवाद साधते. मस्त फोटो सेशन करते. मात्र यावेळी तिने हाती माईक घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. गार्गीच्या भाषणास उपस्थितांनी दाद दिली. कार्यक्रमात सत्कार झालेल्या सर्वांचे अभिनंदन करण्यास ती विसरली नाही, हे विशेष.