* कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांना मिळाला मान
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
जागतिक अन्न सुरक्षेत भारताचे महत्त्वपूर्ण योगदान सुरूच आहे. येणाऱ्या काळात हे योगदान अधिक मजबूत होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्यावतीने वर्ल्ड फुड इंडीया या कार्यक्रमाचे उदघाटन 26 सप्टेंबरच्या सायंकाळी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. ते पुढे म्हाणाले की, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी सहकारी संस्था महत्वाची भुमिका बजावत आहे. भारतातील लहान शेतकरी सुध्दा शेतातील उत्पादने बाजार पेठेत विक्रीसाठी आणत आहे. हाच आत्मनिर्भर भारत आहे, असेही ते म्हणाले. या उदघाटन कार्यक्रमाला रुसचे उप पंतप्रधान दिमीत्री पात्रुशेव, अन्न् प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान, केंद्रिय आयुषमंत्री प्रतापराव जाधव, रेल्वे राज्यमंत्री रवनित सिंग बिट्टु उपस्थित होते. अन्न प्रक्रिया क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा मेळावा केंद्र सरकारच्यावतीने आयोजित केला आहे.
या मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मान केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांना मिळला आहे. या मेळाव्याचा उद्देश शेतकऱ्याची उत्पन्न दुप्पट करणे , कृषी उद्योगाला चालना देणे हा आहे. या मेळाव्यामध्ये 21 पेक्षा जास्त देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने आयोजित केलेल्या या मेळाव्याला शेतकऱ्यांशी बांधिलकी जोपासणारे आणि स्वतः शेती करणारे केंद्रीय आयुषमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र प्रतापराव जाधव यांना उपस्थित राहण्याचा हा बहुमान मिळाला आहे. हे बुलढाणा जिल्ह्यासाठी गौरवास्पद आहे.