तब्बल 1631 अखंड नंदादीपाने उजळले माँ जगदंबाचे मंदिर * पत्रकार प्रशांत खंडारे यांना आरतीचा मान

तब्बल 1631 अखंड नंदादीपाने उजळले माँ जगदंबाचे मंदिर 
*  पत्रकार प्रशांत खंडारे यांना आरतीचा मान 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        सध्या नवरात्रोत्सव सुरू असून तालुक्यातील सव येथील जगदंबा देवी संस्थानमध्ये तब्बल 1631 अखंड नंदादीपाने जगदंबाचे मंदिर उजळले आहे.आज पत्रकार प्रशांत खंडारे यांनी महाआरती केली.

       सन 2015 पासून नवरात्र काळात अखंड नंदादीप तेवत ठेवण्याची परंपरेची सुरुवात नवरात्रीत उत्साहात करण्यात आली. बुलडाणा
शहरापासून जवळच सव येथे
जगदंबा देवी संस्थान आहे. या
मंदिरातील मूर्ती ही पूर्वमुखी आहे.
नवरात्र उत्सवात दरवर्षी हे मंदिर
व परिसर अखंड दिव्यांनी उजळून
निघत असते. सव हे गाव बुलडाणा-चिखली रस्त्यावर आहे. या मंदिरात अखंड नंदादीपची सेवा जगदंबा देवी संस्थान परिसर मधील दोन सभागृहांमध्ये भक्तांकडून चारशे रुपये देणगी घेवून अधिकृतरित्या पावती नोंदणी क्रमांक देण्यात येतो. मातीच्या भांड्यामध्ये पाणी भरुन वरील बाजूस दिप ठेवून तेल व वात लावण्यात येते. ज्या भक्तांना ही ज्योत स्वतः पेटवायची आहे, ती त्याच्याकडून घटस्थापनेच्या दिवशी पेटवल्यानंतर नऊ दिवस अखंडितपणे तेल व वातीचे नियोजन हे संस्थेतील कर्मचाऱ्यांकडून केल्या जाते. अखंडितपणे दिवे तेवत
ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षी
मंदिर परिसरामध्ये भक्तांकडून लावण्यात आलेले अखंड नंदादिप लावलेत. भक्तांनी अखंड नंदादीपची नोंदणी केली असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. चैत्र व शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जाते. दर मंगळवारी भाविकांची या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी होते.
         नवरात्रात भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येत असतात. नवरात्र अखंड नंदादीप या उपक्रमाला सन 2015 पासून नवरात्र काळात सुरुवात करण्यात आली. प्रथम वर्षी 102 भक्तांनी अखंड नंदादीपच्या उपक्रमाला प्रोत्साहान दिल्या नंतर हळूहळू हा उपक्रम वाढत गेला. 2016 मध्ये 302 तर 2017 साली 550 नंदादीप, 2018 मध्ये 801 तर पुढे भक्तांच्या प्रोत्साहनाने 2019 मध्ये
एक हजाराचा टप्पा पार करत 1044
अखंड नंदादीप तेवत ठेवण्यात आले. तर नंतर च्या वर्षी 2020 लागता क्षणीच 160 नंदादीपांचे आरक्षण भक्तांनी करुन ठेवले होते. त्यामुळे 1100 अखंड नंदादीप तेवत
ठेवण्यात आले होते. सद्यस्थितीत 27 सप्टेंबर रोजी तब्बल 1631 अखंड नंदादीपाने माँ जगदंबाचे मंदिर उजळले आहे.