मॉडेल डिग्री कॉलेज येथे राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

मॉडेल डिग्री कॉलेज येथे राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
बुलडाणा : (एशिया मंच न्यूज )
          महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सामाजीक दायित्वाचे शिक्षण राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मिळत असते असे प्रतिपादन मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ अण्णासाहेब म्हळसणे यांनी व्यक्त केले.
        बुलडाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेज येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन , हिंदी दिवस आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमला प्रमुख अतिथी म्हणून एसपीएम कॉलेज चिखली येथील डॉ.केदार ठोसर, प्रा. किसन वाघ, प्रा. अरुण रिढे, प्रा. माने प्राध्यापिकां शिबरे व्यासपिठावर उपस्थित होत्या.  यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.अण्णासाहेब म्हळसणे म्हणाले की , राष्ट्रीय सेवा योजना हा फक्त एक उपक्रम नाही, तर तो आपल्या मधील सामाजिक जबाबदारीची भावना जागृत करणारा एक विचार आहे. 'मी नाही तर कोण?' या विचारातूनच एक चांगला समाज घडतो. विद्यार्थ्यांना समाजाच्या विकासासाठी सक्रियपणे योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. डॉ.केदार ठोसर यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आयुषभर गोरगरिब जनतेचा विचार केला. त्यांचा 'एकात्म मानववाद' हा विचार समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळावी आणि अंतोदय योजनेप्रमाणे तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सर्वांचाच विकास व्हावा यासाठी त्यानी आपले आयुष पणाला लावले . त्यांच्या विचारांच्या शिकवणीवर आपण एक मजबूत राष्ट्र घडवू शकतो. असे प्रतिपादन डॉ. केदार ठोसर यांनी यावेळी व्यक्त केले.
        कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अरुण रिंढे यांनी सूत्रसंचालन हर्षद निकम याने , तर आभार कु.अंजली धुरंदर हिने मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.महेश व्यवहारे यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS) बद्दल जागरूकता वाढवणे, तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या 'एकात्म मानववाद' या विचारांची ओळख करून देणे हा होता. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.