आदर्श शिक्षक सपकाळ यांच्या निवासस्थानी भेट* बुलढाण्याच्या समाजकारणात सपकाळ परिवाराचे योगदान मोठे : आमदार अडबाले

आदर्श शिक्षक सपकाळ यांच्या निवासस्थानी भेट
* बुलढाण्याच्या समाजकारणात सपकाळ परिवाराचे योगदान मोठे :  आमदार अडबाले 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, लेखक पी. डी. सपकाळ यांच्या निवासस्थानी नागपूर विधानसभा मतदार संघाचे आ. सुधाकर आडबाले यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी सपकाळ यांच्या प्रकृतीची चौकशी केली. सपकाळ परिवाराने शैक्षणिक सह सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य केले. या परिवाराने सामाजिक कार्यास नेहमीच अग्रक्रम दिला. येथील सुसंस्कृत समाजकारण घडविण्यात या परिवाराचा वाटा मोठा असल्याचे आडबाले म्हणाले.
        आमदार आडबाले बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. बुलढाणा येथे आल्यानंतर त्यांनी सकाळी समता नगर येथील आदर्श शिक्षक, लेखक सपकाळ यांच्या निवासस्थानी भेट दिली. प्रा.सुनील सपकाळ यांनी सर्व मान्यवरांचा सन्मान केला. यू. व्ही डायगव्हाणे यांनी प्रतापराव सपकाळ यांच्या नागपूर मंडळातील सदस्य असतांना केलेल्या कार्याची आठवण करून दिली. तर सपकाळ कुटुंबियांकडून मान्यवरांचा पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील सपकाळ, संघटनेचे पदाधिकारी राम बारोटे, अध्यक्ष अरविंद देशमुख, सोनखासारे , सतीश शेळके , हिंगे
प्रशांत सपकाळ, शरद सपकाळ, रमेश सपकाळ, सूजीत देशमुख, डी. एम. कापसे, राजपूत सर, बी. ए. सोनुने, प्रा. विजय घ्याळ, आर. वाय. जाधव यांची उपस्थिती होती.