दुर्गेच्या साक्षीने विधवा विवाह सोहळ्यात पाच जोडप्यांच्या रेशीमगाठी...* समाज ऋणातून उतराई होण्याचे कार्य मानस फाउंडेशन करीत आहे - एएसपी गायकवाड

दुर्गेच्या साक्षीने विधवा विवाह सोहळ्यात पाच जोडप्यांच्या रेशीमगाठी...
* समाज ऋणातून उतराई होण्याचे कार्य मानस फाउंडेशन करीत आहे - एएसपी गायकवाड
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        मानस फाउंडेशनच्या दुर्गा देवी उत्सवात यंदा चक्क विधवा विवाह सोहळा पार पडला. पाच विधवा भगिनींनी आपल्या जोडीदारासोबत आयुष्यभराची रेशीमगाठ बांधली. दुर्गेच्या साक्षीने पार पडलेला हा सोहळा समाज परिवर्तनाची नांदी ठरला. तर मानस फाउंडेशनचे कार्य आपण समाजाचे देणे लागतो, त्याची उतराई होण्याच आहे. आपण सदैव या कार्यासोबत आहोत, असे प्रतिपादन जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी यावेळी केले.                                 
        नवरात्र उत्सवानिमित्त मानस फाउंडेशन व शिवसाई परिवार यांच्या वतीने एकल महिलांचा मेळावा आणि पुनर्विवाह सोहळा डी. एस. लहाने यांच्या संकल्पनेत 27 सप्टेबर रोजी समता नगर शिवसाइ ज्ञानपीठ येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसाई परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. वसंतराव चिंचोले होते. तर मुख्य अतिथी श्वेता खेडकर पोलीस उपयुक्त पिंपरी चिंचवड, प्रमुख मार्गदर्शक अमोल गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा, मानस फाउंडेशन चे अध्यक्ष प्रा. डी.एस. लहाने, प्रा.शाहिना पठाण, प्रा.राहुल हिवाळे, बबन पाटील, सरपंच पवार, अश्विनी सोनुने आदी उपस्थित होते. 
           पुढे बोलताना एएसपी गायकवाड म्हणाले, ज्या समाजात आपला जन्म होतो, जिथे आपण लहानसे मोठे होतो,  वाढतो त्या समाजाचे आपण देणे लागतो याची जाण असावी लागते. ही भावना ठेवून मानस फाउंडेशन कार्य करीत आहे. अनेक विधवा महिलांनी रेशीम गाठी बांधल्या , या पूर्वी विवाह सोहळे घडले आहेत. समाजात विधवा शब्दच नसावा, समता हीच आपली मूलतत्वे आहे. मानस फाउंडेशन या महिलांसाठी कार्य करत आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. समानतेचा विचार हा संविधानिक अधिकार आहे. आपण या कार्यासाठी सदैव सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली. अडीअडचणीच्या काळात विधवा बहिणीने केव्हाही फोन केला तरी धावून येऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. 

       प्रास्ताविक प्रा. डी. एस. लहाने यांनी केले. मानस फाउंडेशनच्या कार्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. विधवा महिलांना आत्मबळ देणे हा उद्देश ठेवून मानस फाउंडेशनची वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रभर लोकचळवळ म्हणून हे काम नेटाने पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सत्यशोधक पद्धतीने एकूण पाच जोडप्यांचा पुनर्विवाह कौटुंबिक व आनंददायी वातावरणात पार पडला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संसार उपयोगी वस्तूंचा संच जोडप्याना देण्यात आला. सदर सोहळ्याला प्राचार्य शाहिना पठाण, पत्रकार गणेश निकम, प्रतिभा भुतेकर,ज्योती पाटील, वैशाली तायडे, प्रज्ञा लांजेवार ,अनिता कापरे, मनीषा वारे,अँड.संदीप जाधव,गजानन मुळे,पंजाबराव गवई , पत्रकार सुरेखा सावळे , अँड. मृणाल सावळे,मानस फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.संचलन वैशाली तायडे यांनी केले.


* महिलांना कौटुंबिक न्याय देणारे विचारपीठ मिळाले :  एसीपी श्वेता खेडकर

        कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी श्वेता खेडकर म्हणाल्या की प्रा.डी. एस.  लहाने व मानस फाउंडेशन बुलढाणा ही संस्था सामाजिक उत्थानाचे प्रभावी कार्य करत आहे. महिला क्रांतिला महिलांचा प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. हे निश्चितच कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे.महिलांसाठी मानस फाउंडेशन कौटुंबिक न्याय देणारे हक्काचे विचारपीठ झाले आहे.समाजातील प्रत्येक महिलांनी संकटांना समोर जाण्यासाठी प्रत्येक क्षणी विवेकवादी विचार जोपासून सकारात्मक दृष्टीने राहणे गरजेचे आहे. असे सांगून उपस्थित महिलांच्या अडचणी जाणून त्यांनी संवाद साधला.

* यांचे जुळले संसार....
         यावेळी पाच जोडपी विवाहबद्ध झाली त्यामध्ये सुरेश साळुंखे व रंजना परिहार चिखली, हरिभाऊ धुरंदर वरखेड व रमा जाधव रायपूर, प्रताप क्षीरसागर धा.बढे व वंदना मोरे चांडोळ, राजू गणेश सुरडकर धा.बढे.व नंदा खडसे वर्धा, प्रशांत मोरे शेलापूर व प्रियंका मोरे यांचा विवाह पार पडला.जोडप्यांना शिवशाही परिवाराकडून आहेर भेट देण्यात आली. विवाह सोहळा सत्यशोधक पद्धतीने शिक्षक अशोक गोरे यांनी पार पडला.