शेतकऱ्यांच्या डोळ्यातील वेदना पाहून मन सुन्न झालं ! : रविकांत तुपकर* शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून केली पाहणी

शेतकऱ्यांच्या डोळ्यातील वेदना पाहून मन सुन्न झालं ! : रविकांत तुपकर
* शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून केली पाहणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      शेतकऱ्यांच्या शेतपिकातील साचलेले पाणी पाहून डोळ्यात अक्षश: आश्रू आवरले गेले नाही, असे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज 29 सप्टेंबर रोजी मोताळा तालुक्यातील खामखेड, गुळभेली, राहेरा, नळकुंड, दाभा, तांडा, उबाळखेड, रोहिणखेड, खेडी, पान्हेरा, कोऱ्हाळा बाजार तसेच बुलढाणा तालुक्यातील गिरडा, चौथा, पाडळी यासह अनेक गावांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली.            यावेळी शेतकऱ्यांची भेट घेत त्यांना धीर दिला. अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या, शेतीपीके पूर्ण उध्वस्त झाली आहेत. यावेळी कोलमडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

      ५० वर्षातही एवढी विपरीत परिस्थिती कधीच पाहिली नाही, असे लोकं सांगत होते. शेतं उध्वस्त झाली,  सोयाबीन -कापूस हातातून गेले असून नुकसान फक्त नदीकाठचेच झाले आहे, असे नाही तर सततच्या पावसाने प्रत्येक शेतात पाणी साचले,  त्या शेतातही सोयाबीनच्या शेंगाना कोंब आले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणीही सरसकट पंचनामे व्हावेत, अशी आमची आग्रही मागणी आहे.
         शेतकऱ्यांच्या हक्कावर कुणाला डाका घालू देणार नाही,  सरकारने सरसकट नुकसान भरपाई तात्काळ न दिल्यास येत्या काही दिवसात बुलडाणा जिल्ह्यातून भव्य आंदोलन पेटवू, एवढी वाईट परिस्थिती कधीच पाहिली नाही, असेही शेतकरी नेते रविकांत तुपकर सरकारला इशारा दिला आहे.