मोताळा : (एशिया मंच न्यूज )
तालुक्यातील धामणगाव बढे स्थानिक राजे छत्रपती कला महाविद्यालय येथे राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने माहितीचा अधिकार या दिनानिमित्त माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश मेश्राम हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. भगवान गरुडे राज्यशास्त्र विभागप्रमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर महादेव रिठे व सर्जेराव चव्हाण हे उपस्थित होते. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले.
यावेळी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 याची निर्मिती तिचा उद्देश त्यातील तरतुदी अंमलबजावणी आणि काही बंधने याविषयी सखोल असे मार्गदर्शन डॉ. भगवान गरुडे यांनी केले. यावेळी प्राचार्य अविनाश मेश्राम यांनी सुद्धा माहितीच्या अधिकारातून विविध समाज उपयोगी कार्यकर्ता येतात याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर स्वप्नील दांदळे तर आभार प्रदर्शन डॉ. महादेव रीठे यांनी केले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका इतर कर्मचारी व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.