बुलडाण्यात बंजारा समाजाचे शक्तीप्रदर्शन* एस. टी.आरक्षणासाठी धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बुलडाण्यात बंजारा समाजाचे शक्तीप्रदर्शन
* एस. टी.आरक्षणासाठी धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      बंजारा समाजाचा हैद्राबाद गॅजेटीअर व सी. पी. बेरार ॲक्ट नुसार एस. टी. अनु. जमाती प्रवर्गातून आरक्षणासाठी आज 25 सप्टेंबर रोजी बुलडाण्यात बंजारा समाजाने शक्ती प्रदर्शन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

    यावेळी या ऐतिहासिक मोर्चाचे आकर्षण बंजारा महिलांचे परंपारीक वेशभूषा परिधान केल्याने एक आगळे वेगळे स्वरूप आले होते. 
         मोर्चेकरांच्या हातातील फलक यावर लागू करा लागू करा हौद्राबाद गॅजेटीअर लागू करा.., उठ बंजारा जागा हो, एस. टी. आरक्षणचा धागा हो.., अस कस देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही.., आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचं.., अभी नही तो, फिर कभी नही.., हम आयेंगे लखो से, तुम देखना आखों से.. असे फलक हातात घेऊन मोर्चेकरी घोषणा बाजी करीत होते.

     येथील जिजामाता प्रेक्षागार मैदानावर आयोजित  जाहीर सभेत बंजारा  समाजाच्या नेत्यांनी समाजाला मार्गदर्शन करतांना सांगितले की,
बंजारा समाजाला हैद्राबाद गॅजेटीअर व सी. पी. बेरार ॲक्ट नुसार एस. टी. अनु. जमाती प्रवर्गातून आपल्याला आरक्षण मिळावे, यासाठी आपण सर्वजण समाज बांधव  उपस्थितीत राहून महाराष्ट्र शासनाला एकजुटीचे एकप्रकारे शक्ती प्रदर्शन दाखवून देत, असल्याचे एकमताने सांगितले.
      यावेळी व्यास पिठावरील चिमुकल्या मुलींची उपस्थिती आकर्षण ठरली.  यानंतर विराट मोर्चाची सुरुवात करण्यात आली. समाजाचे नेते ॲड .संजय राठोड,अभय चव्हाण, आमदार राजेश राठोड,राजेश बन्सीलाल राठोड,विनायक राठोड, राम राठोड, महंत सुनिल महाराज, प्राध्य.अरविंद चव्हाण, उपसरपंच निलेश राठोड, एकनाथ चव्हाण, साहेबराव चव्हाण, भूपेश जाधव, गजानन चव्हाण , विठ्ठल चव्हाण, अनिल चव्हाण, राजेश फकिरा, निलेश राठोड, रमेश चव्हाण, उखा चव्हाण, राम राठोड, विनायक राठोड,रितेश चव्हाण, आकाश जाधव, छोटू पवार, विलास रामावत, अश्विन जाधव,यांच्या नेतृत्व काढण्यात आलेला हा मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार लाईन, जनता चौक, कारंजा चौक, जिल्हा न्यायालय, स्टेट बँक चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. याठिकाणी एक गोर सव्वा लाखेर जोर!

        बंजारा समाजाच्या महिला शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यात यावेत, हैदराबाद गॅझेटियर संदर्भान्वये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षणाबाबत दिलेल्या शासन निर्णयाप्रमाणे त्याच हैदराबाद सेंट्रल प्रोविन्स अँड बेरारच्या १९५० चा भारताचा गॅजेट तसेच १९५६ च्या करारनाम्यानुसार आणि तत्सम आयोगाच्या शिफारशीनुसार बंजारा समाजाला तात्काळ संविधानातील अनुच्छेद १४ व २१ प्रमाणे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर शासन निर्णय काढून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व शासकीय सवलती लागू करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी आकाश जाधव, सोनु चव्हाण, निंबाजी पवार, रवि चव्हाण,राजू नायक, दयाराम जाधव, राजू राठोड, दिगंबर चव्हाणतेजराव जाधव, बाबूसिंग जाधव, रितेश चव्हाण, उमेश राठोड, अश्विन जाधव, मांगीलाल महाराज, भुजंग सर, प्रकाश चव्हाण, नितीन राठोड, दिनकर चव्हाण, दिपक चव्हाण, गौरव राठोड, विट्ठल राठोड,यांच्यासह असंख्य बंजारा समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.

* मोर्चात महिलांची गर्दी ठरली लक्षणीय ...
    या मोर्चामध्ये बंजारा समाजाच्या महिला मंडळींनी परंपारिक वेशभुषा परिधान केल्याने यावेळी मोर्चाला एक आगळे वेगळे स्वरूप दिसून आले.

* बंजारा समाजाच्या तरुण वर्गात दिसून आला उत्स्फूर्त प्रतिसाद...
      एस.टी. आरक्षण मिळण्यासाठी तरुण वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. यावेळी तरुण युवक वर्गानी एक गोर सव्वा लाखेर जोर, अस कस देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही, असे विविध घोषनेने परिसर दानाणून गेला होता.
* हा लढा असाच चालु ठेवावा – संजय राठोड

        मागील अनेक दशका पासून बंजारा समाज हा डोंगरदऱ्यावर, जंगलात भटकंती करुन राहत होता. आताकुठे हा समाज शिकला. मात्र  त्याला आपल्या न्याय हक्कासाठी अजुनही लढा द्यावा, लागत आहे. बंजारा समाजाला एसटी आरक्षण लागू करावे, ही मागणी गेल्या ३० ते ३५ वर्षापासून दिल्ली दरबारी सातत्याने सुरु आहे. मात्र अद्याप समाजाला न्याय मिळाला नाही. आता तर हैदराबाद गॅझेटीयर व सी.पी. अॅण्ड बेरार अॅक्टचा मोठा आधार समाजाला मिळाला आहे. आता हीच ती वेळ आहे की, आपल्या संवैधानिक अधिकार मिळविण्यासाठी हा लढा आता आपल्याला असाच चालु ठेवावा लागणार आहे, असे प्रतिपादन संजय राठोड यांनी केले.