* अमोल मोरे यांच्या प्रयत्नाला आले यश
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
सिंदखेडराजा येथील गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेले अन्यायग्रस्त शेतकरी रामदास व सौ. मेहेत्रे यांचे आमरण उपोषण अखेर स्थगित झाले. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गुडदे , क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमोल मोरे, कैलास भाऊ मेहेत्रे (शेतकरी संघर्ष समिती) यांच्या मध्यस्थीने हा तोडगा निघाला.
शेतकरी दांपत्याने प्रशासनाकडे बांधकाम विभाग, नगरपालिका या विभागाने २०११ मध्ये यांच्या शेतातून रस्ता केला होता. सदर रस्त्याची उंची जास्त घेतल्यामुळे मेहेत्रे यांच्या शेतात पाणी साचत असे. त्या पाण्यामुळे दरवर्षी शेती पिकाचे नुकसान होत आहे म्हणून ते पाणी शेताच्या बाहेर काढण्याची मागणी करत होते.
आठवड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. दीर्घकाळ उपोषणामुळे शेतकरी दांपत्याची प्रकृती बिघडण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे प्रशासनावर मोठा दबाव वाढला होता. आज झालेल्या चर्चेत बांधकाम विभाग, नगरपालिका , तहसीलदार यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही मागण्यांचा तातडीने विचार करण्याची ग्वाही दिली.
शेतातील साचलेले पाणी, पाईप टाकून काढण्यात येईल, अशी हमी देऊन, लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकरी दांपत्याने उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी तहसीलदार , नगरपालिकेचे सीईओ, पंचायत समितीचे बीडीओ यांनी उपोषणाला भेट देत. आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जाईल, असा विश्वास व्यक्त केला.