* अॅड. सुनिल देशमुख यांची जिल्हा पुरवठा कार्यालयावर धडक
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
मासरुळ सर्कलातील नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजप नेते अॅड. सुनिल देशमुख आक्रमक होतं जिल्हा पुरवठा कार्यालयावर धडक दिली. यावेळी निवेदनाद्वारे समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, गुम्मी येथील जवळपास 80 रेशनकार्डधारक ज्यांना राशन मिळत नाही. सोबतच शेतकरी लाभार्थ्यांना सुद्धा रेशन चे पैसे मिळत नाही. यासाठी अॅड. सुनील देशमुख सदस्य सल्लागार समिती भारतीय खाद्य महामंडळ, भारत सरकार (FCI) तथा संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसील पुरवठा अधिकारी मॅडम यांची भेट घेऊन पाठपुरावा केला असता. पुढील काही दिवसात आपले रेशनकार्ड चालू होईल, अशी शाश्वती जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांनी दिली.
मासरुळ जिल्हा परिषद सर्कल
मधील ज्या पात्र लाभार्थ्यांना रेशन संदर्भात काही अडचणी असतील त्यांनी सेवा संपर्क कार्यालय भाजपा बुलढाणा तथा 8805903333 या क्रमांकावर संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले.
यावेळी गुम्मी गावातील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल नरोटे, पंडित नरोटे, पंजाब नरोटे, नामदेव नरोटे, रामदास नरोटे, आदी उपस्थित होते.