* दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहाने तरुण -तरुणीचा सहभाग
बुलडाणा : (एशिया मंच न्यूज )
बिसीसीएन बुलडाणा अर्बन गरबा फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने युवा - युवती पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. जिजामाता प्रेक्षागार , बुलडाणा येथील दुसऱ्या दिवशीच्या आरतीला बुलडाणा अर्बन गरबा फेस्टिवलचे मार्गदर्शक राधेशाम चांडक उपाख्य भाईजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या गरबा फेस्टिव्हलला शहरवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला.
या दुसऱ्या दिवशीच्या आरतीला गरबा फेस्टिवलच्या अध्यक्षा सौ. कोमलताई झंवर , सौ. वैशालीताई चव्हाण, कुणाल संजय गायकवाड, आयसीआयसीचे शाखाधिकारी अमित ठाकरे, पत्रकार नितीन सिरसाठ , सुनील तिजारे, बिसीसीआयचे पवन सोनारे आदी मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली.
या कार्यक्रमाचे लालाभाई माधवानी यांनी सुत्रसंचलन केले. तर या कार्यक्रमाचे परिक्षक , सुनयना अंभोरे, किर्ती माहेश्वरी, सुरेश गोरे, राजेश बगाडे, गजानन रिंढे यांनी केले. या गरबा दांडियाला शहरातील महिला तरुण, तरुणी यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. यावेळी कार्यकारिणीचे सर्व सदस्य, बुलडाणा अर्बनचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी गरब्याच्या दुसऱ्या दिवशी सुध्दा मोठ्या संख्येने बक्षिसे वाटप करण्यात आले. यामध्ये बालगोपाल गट, मोठा गट, बेस्ट प्रिन्स, प्रिन्सेस या सर्वांना चांडक लाईफ इन्शुरन्स, HM -28 प्रोटीन, हॉटेल खान्देशी आदींच्या वतीने बक्षिसे देण्यात आली.