सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले- जयश्रीताई शेळके* एकरी ३४०० रुपयांची नुकसान भरपाई तुटपुंजी; हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी

सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले- जयश्रीताई शेळके
* एकरी ३४०० रुपयांची नुकसान भरपाई तुटपुंजी; हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      युती सरकारने एकरी ३४०० रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी टीका शिवसेना (उबाठा) प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी केली आहे. एकरी ३४०० रुपयांची नुकसान भरपाई तुटपुंजी असून हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

      ढगफुटीसदृश्य पावसामुळे पिकांचे सरसकट नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत ही तुटपुंजी रक्कम म्हणजे शेतकरीविरोधी मानसिकता आहे. शेतकऱ्यांना एकरी २० हजार आणि हेक्टरी किमान ५० हजार रुपयांची ओल्या दुष्काळाची नुकसान भरपाई तात्काळ मिळाली पाहिजे, अशी मागणी जयश्रीताई शेळके यांनी केली.

* मोताळा तालुक्यातील नुकसानाची केली पाहणी : 

        दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने १०४ गावे बाधित झाले आहेत. यामध्ये बुलढाणा तालुक्यातील १३ आणि मोताळा तालुक्यातील ६ गावांना फटका बसल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाच्या सर्व्हेतून समोर आली. या पार्श्वभूमीवर आज 24 सप्टेंबर रोजी जयश्रीताई शेळके यांनी मोताळा तालुक्यातील खामखेड, गुळभेली, उबाळखेड, नळकुंड येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तहसीलदार कृषी अधिकारी यांना तातडीने सर्व्हे करण्याबाबत विनंती केली.