पुणे पोलीस उपायुक्त यांची विशेष उपस्थिती* मानस फाउंडेशनच्या दुर्गा उत्सवात सर्व मान विधवांना !

पुणे पोलीस उपायुक्त यांची विशेष उपस्थिती
* मानस फाउंडेशनच्या दुर्गा उत्सवात सर्व मान विधवांना !
 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        स्रीशक्तीचे प्रतीक असणाऱ्या दुर्गा देवीची स्थापना मानस फाउंडेशनने काल उत्साहात केली. शिवसाई ज्ञानपीठ समोर विधवांच्या हस्ते देवीची मूर्ती बसवण्यात आली. पूजा अर्चा व सर्व विधी विधवांनीच पार पाडले. शिवाय नऊ दिवस सर्व सोहळा विधवांच्याच हस्ते पार पडणार आहे. या सामाजिक कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून विधवा भगिनींचे मनोबल वाढविण्यासाठी पुणे पोलीस उपायुक्त यांची विशेष उपस्थिती देखील लाभणार आहे. दुर्गादेवीच्या कार्यक्रमात विधवा विवाह सोहळा आयोजित करून मानस फाऊंडेशनने आपल्या सामाजिक कक्षेची देखील जाणीवही करून दिली आहे.

        बुलढाण्यात मानस फाउंडेशनच्या वतीने विधवा महिलांसाठी कार्य सुरू आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी. एस. लहाने यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. दुर्गा उत्सवामध्ये पूजा आर्चा मान व देवी स्थापनेची सुरुवात विधवा भगिनी पासून करण्याचा मनोदय त्यांनी काही दिवसापूर्वी व्यक्त केला होता. मानस फाउंडेशनने आयोजित केलेल्या मिटिंग मध्ये याला संमती दर्शविली. त्यानुसार दुर्गादेवीची स्थापना विधवा भगिनींच्या हस्ते शिवसाई ज्ञानपीठ समोर 22 तारखेला करण्यात आली. दुर्गा स्री शक्तीचे प्रतीक आहे. घरातील दुर्गा अर्थात आपली भगिनी उपेक्षित जीवन जगत असेल तर नुसते उत्सव करण्यापेक्षा कृतिशील पाऊल टाकलेले केव्हाही चांगले, असे प्राध्यापक लहाने यावेळी म्हणाले. या भूमिकेतून आम्ही नऊ दिवस विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले आहे. या उपक्रमातून विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांना व त्यांच्या मुलांना समाजाने सन्मानाने स्वीकारावे, यासाठी ही चळवळ राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. 
          नऊ दिवस मानस फाउंडेशनने विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. त्यामध्ये समाजामध्ये विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान फाउंडेशन करणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिला योगदान देतात परंतु बऱ्याच वेळा त्याची दखल घेतल्या जात नाही, अशा कर्तुत्वान महिलांना हेरून त्यांचा सन्मान केला जाणार आहे. पारंपारिक धारणेनुसार ,परंपरेनुसार विधवा महिला पुन्हा विवाह करत नाही. बऱ्याच समाजामध्ये हे पाळले जाते. मात्र पारंपारिक रूढी परंपरांना झुगारून ज्या महिलांनी पुनर्विवाह केला व सुखाने जीवन जगत आहेत अशा महिलांचा सन्मान देखील केल्या जाणार आहे. 
       दुर्गा उत्सव म्हटला की, गरबा आलाच, त्यानुसार दररोज रात्री मनोरंजनासाठी गरब्याचे आयोजन देखील आहे. वेगवेगळे विषय देऊन शालेय विद्यार्थ्यांना लिहिण्यास प्रवृत्त करणे, वाचण्यास प्रवृत्त करणे या उद्देशाने निबंध स्पर्धेचे आयोजनही आहे. विजेत्यांना यथोचित विविध बक्षीस देखील दिली जाणार आहे. 

 * पोलीस उपायुक्त म्हणाल्या मी तर येणार....
        शैक्षणिक क्षेत्रामध्ये महिलांनी आपला दमदार ठसा उमटविला आहे. विविध क्षेत्रांमध्ये प्रशासकीय पातळीवर त्या कार्यरत आहे. पुणे पोलीस उपायुक्त श्वेता खेळकर यांनीही मानस फाउंडेशनच्या कार्यामध्ये सहभागी होण्यास सहमती दर्शवली आहे. त्या 27 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी आहे. श्वेता केळकर ह्या पूर्वी बुलढाणा येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. तर बक्षीस वितरण सोहळा डीवायएसपी बुलढाणा गायकवाड  यांच्याहस्ते होत आहे.
        या कार्यक्रमासाठी मानस फाउंडेशनचे गणेश निकम केळवदकर, प्राचार्य शाहीनाताई पठाण , मनीषा वारे, प्रतिभा भुतेकर, सुरेखा सावळे, प्रज्ञा लांजेवार, प्रा. ज्योती पाटील, अनिता कापरे , ऍडव्होकेट संदीप जाधव, गजानन मुळे, पंजाबराव गवई ,शिवाजी शिंदे व शिवशाही परिवाराचे सदस्य मेहनत घेत आहे.