* जीवघेण्या आजाराचे निदान करणारे एम.आर.आय मशीन बंद
* त्वरित यंत्रणा कार्यान्वित न केल्यास भीम आर्मीचा तीव्र आंदोलनाचा इशारा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
गोरगरीब गरजू रुग्णांच्या आरोग्याशी निगडित, आरोग्याच्या सेवेसाठी असणारं जिल्हास्तरावरिल जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गाव खेड्यापासून ते तांडा वस्तीतून लोक सातत्याने येत असतात. शासनाच्या माध्यमातून उपचार घेण्यासाठी या रुग्णालयामध्ये विविध मशीन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये अतिशय गंभीर व महत्त्वपूर्ण आजारांचे निदान करण्यासाठी एम.आर.आय मशीन सुद्धा देण्यात आलेले आहे. परंतु राजकीय श्रेयवादातून संबंधित एम.आर.आय मशीन अनेक दिवसापासून कार्यान्वित न करता धूळखात पडल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. यामुळे गरीब व गरजू रुग्णांना खाजगी दवाखान्यात जाऊन एम.आर.आय करणे शक्य होत नाही अशा रुग्णांची हेळसांड होत आहे. नव्याने जिल्हा शल्य चिकित्सकाचा कार्यभार घेतलेल्या दत्तात्रय बिराजदार यांचे कडून सर्वसामान्य जनतेला सकारात्मक अपेक्षा आहे. परंतु शासकीय यंत्रणा अशा पद्धतीने दवाखान्यात धुळ खात असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे पुढील सात दिवसात एम .आर. आय मशीन कार्यान्वित करून गरजू रुग्णांच्या सेवेत उपलब्ध न केल्यास सरकारी दवाखान्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असलेल्या प्रशासनाच्या विरोधात तीव्र व व्यापक स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी दिला आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून एम. आर .आय मशीनला श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल, असेही सतीश पवार यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.