व्यक्तिमत्त्वातील सकारात्मकपणा विकसित करा, मार्ग मिळतो - एसीपी श्वेता खेडकर
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
आयुष्यात काही करण्यासाठी त्याग करणे महत्त्वाचे असते, कुठल्याही प्रकारचे काम करण्याची तयारी व व्यक्तिमत्वातील सकारात्मकपणा प्रेरित केल्यास यशाचा मार्ग हमखास मिळतो, असे प्रतिपादन पुणे पोलिस उपायुक्त श्वेता खेळकर यांनी बुलडाणा येथे केले.
येथील मानस फाउंडेशनच्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. कार्यक्रम शिवसाई युनिव्हर्सल येथे आज 27 सप्टेंबर रोजी सकाळी पार पडला. यावेळी त्यांनी बुलढाणाकरांशी मनमोकळा संवाद साधला. मानस फाउंडेशनच्या वतीने दुर्गा देवी उत्सव निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी. एस. लहाने हे होते. तर मानस फाउंडेशनच्या शहिणा पठाण प्रमुख अतिथी होत्या. शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत मान्यवर, पत्रकार , डॉक्टर्स , मानस फाउंडेशन चे कार्यकर्ते व शिवशाही परिवाराचे विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना श्वेता खेडकर म्हणाल्या, बुलढाणा शहराने सकारात्मक अनुभव दिला आहे. या ठिकाणी नोकरीतील आनंदाचा अनुभव घेता आला. राज्यामध्ये अनेक ठिकाणी नोकरी केली. मात्र बुलढाण्याचे लोक सुज्ञ, प्रेमळ असल्याचे श्वेता खेडकर म्हणाले. यावेळेस त्यांनी बुलढाणाकरांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळेपणे उत्तरे दिली. महिलांच्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, कुटुंबाला आर्थिक स्रोत गरजेचा आहे. यासाठी महिलांना शैक्षणिक प्रवाह मध्ये उतरवले पाहिज. एके काळी पोलीस खात्यात पाचशे पुरुष आणि 5 ते 25 स्त्रिया असे चित्र होते .हे चित्र बदलत आहे. घरामध्ये नोकरदार महिला असेल तर त्या घराचे चित्र बदलते, मात्र आम्ही तुझ्यासोबत आहोत, हा विश्वास आपण त्यांना दिला पाहिजे. नोकरी करताना घरातील जबाबदाऱ्या ह्या देखील त्यांनाच पार पाडाव्या लागतात. ज्या घरात मुली नोकरी करत असतील अशांना कुटुंबातील सदस्यांनी साथ दिली,पाहिजे असे त्या म्हणाल्या.
* उत्सवातून प्रेरणा मिळते :
आपण आपल्या श्रद्धास्थानाला मूर्ती रुपात पुजत असतो. कोणी कशाची पूजा करावी, कोणाला मानावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र जसे आपण आईला मानतो, जिजाऊ, ताराराणी ह्या जसे आपल्यासाठी प्रेरणा आहे. तसे शक्ती स्थान हे तुम्हाला ऊर्जा देतात. अशा शक्ती स्थानापासून आपण ऊर्जा घेऊन पुढे गेले पाहिजे. समाजात, कुटुंबामध्ये चांगला बदल घडवायचा असेल तर सकारात्मक विचार प्रेरित करावा, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. व मानस फाउंडेशन ने सुरु केलेल्या कार्याचे कौतुक केले.
प्रा. डी. एस. लहाने यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. ते म्हणाले मानस फाउंडेशनच्या माध्यमातून एकल महिलांसाठी कार्य करण्याचा वसा आम्ही घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दुर्गा उत्सवामध्ये विविध सामाजिक व विधवांशी निगडित कार्यक्रमाचे आयोजन केले, असल्याचे लहाने यांनी सांगितले. शिवसाई युनिव्हर्सल च्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना बोलावून त्यांच्या मुलाखती घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पुण्याच्या पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर यांची मुलाखत शिवशाहीच्या विद्यार्थ्यांनी घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलखुलाच उत्तरे दिली. बुलढाणाकरांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी भाष्य केले. मानस फाउंडेशन चे गणेश निकम, पत्रकार राजेंद्र काळे, राजेश दिडोळकर, अरुण जैन, लक्ष्मीकांत बगाडे, संदीप वानखेडे , दीपक मोरे ,सुनील तिजारे, पवन सोनारे , गणेश उबरहांडे , शौकत शहा, सुनील मोरे, प्रशांत सोनवणे, एन. एच. पठाण सर, पारवे सर, डॉ.माधवी जावरे, डॉ.आशिष खासबागे, शीतल सोनूने, पत्रकार सुरेखा सावळे, अँड.मृणाल सावळे ,प्रज्ञा लांजेवार, मनीषा वारे, अनिता कापरे, वर्षा सोनवणे, राहुल हिवाळे ,गजानन मुळे, प्राचार्य मोहरकर, प्रा. ज्योती पाटील यांची उपस्थिती होती.