बीसीसीएन - बुलडाणा अर्बन गरबा फेस्टिवल -2025 चे आयोजन * मराठी सिने अभिनेत्री हेमल इंगळे यंदाचे मुख्य आकर्षण

बीसीसीएन - बुलडाणा अर्बन गरबा फेस्टिवल -2025 चे आयोजन 
* मराठी सिने अभिनेत्री हेमल इंगळे यंदाचे मुख्य आकर्षण
बुलढाणा :  (एशिया मंच न्यूज )
          शहर व संपूर्ण बुलडाणा जिल्हा आकर्षण असलेल्या बीसीसीएन - बुलडाणा अर्बन गरबा फेस्टिवलचे मागील १९ वर्षांपासून गरबा फेस्टिवलचे थाटात आयोजन करण्यात येते. यावर्षी सुध्दा खास नवरात्रोत्सवा निमित्त  22 सप्टेंबर 30 सप्टेंबर रोजी बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम येथे सायं 7.30 या वेळेत होणार आहे.
          यंदाचे मुख्य आकर्षण आहे, ते मराठी चित्रपटातील प्रसिध्द असलेली नवरा माझा नवसाचा फेम हेमल इंगळे या सोमवार  29 सप्टेंबर 2025 रोजी सायं 7.00 येणार आहेत. याप्रसंगी गरबा फेस्टिवलचे आयोजन समितीच्या अध्यक्षा सौ. कोमलताई सुकेशजी झंवर, कार्याध्यक्ष ॲड. जितेंद्र कोठारी, बीसीसीएनचे दिनेश अहेर, तर मार्गदर्शक  अनंताभाऊ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे.
          तरी या गरबा फेस्टिवल शहर व परिसरातील तरुण, तरुणी व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे वतीने करण्यात आले आहे.