* उभे पिक वाहून गेल्याने लाखोंचे नुकसान
सिं. राजा : (एशिया मंच न्यूज )
मागील दोन-तीन दिवसापासून तालुक्यामध्ये सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने जांभोरा गावातील तलाव 17 ऑगस्ट रोजी या पाण्यामुळे फुटला असुन शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने तत्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यातय यावी, अशी मागणी शेतकरी वर्गात होत आहे.
या पाऊसाने नदी-नाल्यांना पूर आल्याने तलावात मुबलक पाण्याचा झाला आहे. जांभोरा येथील शेतकरी सोपान बाबुराव खरात यांच्या शेताजवळ असलेल्या गट नंबर 53 व 54 मध्ये तलाव असुन त्यामध्ये पाण्याचा दाब जास्त वाढल्यामुळे तलाव फुटला असून त्यामुळे खालच्या भागांमध्ये असलेल्या शेकडो एकरवर उभे असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तलाव फुटल्याची माहिती मिळताच गांवातील बबनराव खरात व रमेशराव खरात यांनी सिंचन विभाग, तलाठी, महसूल प्रशासनाला तात्काळ भ्रमणध्वनी वरून संपर्क करून घटनेची माहिती दिली. तलाव फुटून पाण्याचा विसर्ग जास्त असल्यामुळे शेतामध्ये उभे असलेले सोयाबीन, कपाशी, फळबाग, भाजीपाला यासह इतर पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या तलाव फुटीचा फटका विष्णू अंकुशराव खरात, बाळाभाऊ जैवळ, संतोष जवळ, उद्धवराव खरात , अशोकराव खरात, रमेशराव खरात, व्यंकटेशराव खरात, प्रदीप मधुकर खरात, प्रल्हाद आसाराम खरात, शिवाजी शामराव खरात, योगेश दिनकर खरात, सुनील बळीराम खरात, बालासाहेब भीमराव खरात, गणेश अशोकराव खरात या शेतकèयांचे मोठे नुकसान झाले आहे. तलाव फुटल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
सिंचन विभागाने वेळीच तलावाची पाहणी करून दुरुस्ती केली असती तर शेकडो एकर वरील जमीन पाण्याखाली गेली नसती अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
घटनेची माहिती मिळतात सिंचन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन जेसीबीच्या सहाय्याने फुटलेला तलाव बुजवण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याचा विसर्ग जास्त असल्यामुळे सिंचन विभागाला अपयश आले. तहसीलदार अजित दिवटे यांनी घटनास्थळी दाखल होवून फुटलेल्या तलावाचे पाहणी करुन प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार अजित दिवटे केले आहे.
तलावाचे पाणी शेतामध्ये शिरले असल्याग शेती जलमय झाल्यांची पहायला मिळत आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मोहन गीते, बबनराव खरात, रमेशराव खरात, सोपान खरात, अशोक खरात, प्रदीप खरात, व्यंकटेश खरात, उद्धव खरात, मंगेश खरात, संतोष जैवळ, बंडु खरात, बाळाभाऊ जैवळ, मंगेश खरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.