*मराठा सेवा संघाच्या नागरी सहकारी पतसंस्थेचे आज उद्घाटन !
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
मराठा, बहुजन समाजाला वेगळा विचार देऊन डोळस करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मराठा सेवा संघाने सहकारक क्षेत्रातही पदार्पण केले आहे. मराठा सेवा संघाच्या नागरी सहकारी पतसंस्था बुलढाणाचे रविवार 17 ऑगस्ट रोजी उद्घाटन होत आहे. शरद कला महाविद्यालयाच्या प्रांगणात, दुपारी साडेबारा वाजता हा सोहळा केंद्रीय मंत्री शिवश्री प्रतापराव जाधव यांच्याहस्ते पार पडणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवश्री चंद्रशेखर शिखरे हे राहणार आहेत.
मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सहकाराचे नवीन दालन उभे करण्यात आले आहे. युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा सेवा संघाने वैचारिक क्षेत्रामध्ये भरारी घेतली आहे. तर सहकार क्षेत्रातही आता पाऊल टाकले आहे. सहकारी तत्त्वावरील नागरी पतसंस्थेचे माऊली हाईटस, एमएसईबी ऑफिस जवळ चिखली रोड बुलढाणा या ठिकाणी प्रशस्त कार्यालय उघडण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवश्री आ. आकाश फुंडकर कामगार मंत्री महाराष्ट्र शासन, शिवश्री राधेश्याम चांडक संस्थापक अध्यक्ष बुलढाणा अर्बन, शिवश्री चैनसुख संचेती, शिवश्री धीरज लिंगाडे, शिवमती श्वेताताई महाले, शिवश्री मनोज कायंदे, शिवश्री नानासाहेब चव्हाण, शिवश्री संजय कुटे , शिवश्री संजय गायकवाड ,शिवश्री सिद्धार्थ खरात, महेंद्र चव्हाण, डॉक्टर अशोकराव खरात मुख्याधिकारी जिल्हा बँक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे अवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मनोहर तुपकर ,उपाध्यक्ष इंजिनियर रविकांत काळवाघे ,सचिव एडवोकेट प्रकाश जाधव , इंजिनीयर गुलाबराव कडाळे , सौ. सिंधुताई पाटील, दत्तात्रय शेळके ,सौ.वैशाली अकाल ,विजय काकडे, सौ .ज्योतीताई खेडेकर, सौ.मोहिनी चेके, डॉक्टर अंकिता खरात, कोमल तायडे ,नंदकिशोर सरडे, रामेश्वर भालके यांनी केले आहे. शरद कला महाविद्याच्या प्रांगणात 17 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता हा सोहळा होत आहे.