* राष्ट्रीय एकात्मतेसाठी संघटन शक्ती वाढवूया : रणजीतसिंग राजपूत
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला. बुलढाणा येथील पत्रकारांच्या हक्काची इमारत असलेल्या पत्रकार भवनवरही 15 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण झाल्यानंतर, सर्व पत्रकारांनी एका स्वरात राष्ट्रगीताचे गायन केले. फडकत असलेल्या तिरंग्याला पाहून प्रत्येक पत्रकारांच्या चेहऱ्यावर देशप्रेम झळकले. यानंतर, रणजीतसिंग राजपूत अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, पत्रकारांसाठी हक्काचे ध्वजस्तंभ आहे, आपले भाग्य. राष्ट्रभक्ती टिकून राहण्यासाठी आपण सगळ्यांनी संघटित होणे गरजेचे आहे. विविध क्षेत्रामध्ये पत्रकारांची प्रतिमा उज्वल रहावी, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. याशिवाय अनेक जण, पत्रकारितेला नैतिक स्तरावर देखील नेण्याचे काम करीत असून, याचा अभिमान आहे. ध्वजारोहणासाठी माझे हात या दोरीला लागलेले असतील, तरी ते माझे नसून तमाम पत्रकारांचे आहेत, अशी भावनाही रणजीतसिंग राजपूत यांनी व्यक्त केली. यापुढेही खूप चांगले काम करूया, समाजाला साथ देऊ या.. जेणेकरून समाजही आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील. येत्या काही दिवसात, पत्रकार संघातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. यातून पत्रकारांची एकजूट अधिकाधिक बळकट होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संदीप वानखेडे यांनी केले. याप्रसंगी पत्रकार राजेश डीडोळकर, नितीन शिरसाट, भानुदास लकडे, गणेश निकम, जितेंद्र कायस्थ, गणेश सोळंकी, संदीप शुक्ला, वसीम शेख, कासिम शेख, शिवाजी मामलकर, नदीम शेख, असलम खान, कयूम खान, शब्बीर कुरेशी, सय्यद आसिफ, रहमत अलि शाह, बाबासाहेब जाधव, इसरार देशमुख, सुनील मोरे, अजय राजगुरे, विलास खंडेराव, निलेश देशमुख, तुषार यंगड, अजय काकडे, शंकर राजगुरू, आकाश भालेराव, अभिषेक वरपे यांसह अनेकांची उपस्थिती होती.