'प्रहार'ची तालुका व विभाग कार्यकारिणी गठीत

'प्रहार'ची तालुका व विभाग कार्यकारिणी गठीत  
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         प्रहार जनशक्ती पक्षाची बुलढाणा तालुका व धाड विभाग कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली. त्यामध्ये बुलढाणा उपतालुका प्रमुखपदी गणेश जाधव, धाड विभाग प्रमुखपदी सोणू वाघ, धाड शहराध्यक्षपदी सचिन नेमाने तर युवक आघाडी प्रमुखपदी अजय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.
          प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या विचारधारेने प्रेरीत होऊन जिल्हाभरात प्रहार जनशक्ती पक्षाचे काम जामोत सुरु आहे. रुग्णसेवा, मागेल त्याला रक्त व शेतकरी, शेतमजूर व दिव्यांगांच्या ज्वलंत प्रश्नांवर आक्रमकपणे लढणारा पक्ष म्हणून प्रहारची ओळख आहे. प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका स्वबळावर लढण्याचे आदेश दिल्याने जिल्हाभरात पक्षाची संघटनात्मक बांधणी सुरु आहे. त्या अनुषंगाने गेल्या वीस वर्षांपासून प्रहार जनशक्ती पक्षासोबत एकनिष्ठ असलेल्या तसेच पक्षाच्या प्रत्येक उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आदेशान्वये जबाबदाऱ्या सोपविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने प्रहारचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख बल्लुभाऊ जवंजाळ यांनी बुलढाणा उप तालुका प्रमुखपदी गणेश जाधव, धाड विभाग प्रमुखपदी सोणू वाघ, धाड शहराध्यक्षपदी सचिन नेमाने तर प्रहार युवा आघाडी शहराध्यक्षपदी अजय शिंदे यांची नियुक्ती केली असून अगामी निवडणूकांच्या अनुषंगाने कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. या नियुक्तींमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.