ॲड.सुनिल देशमुख यांची भारतीय खाद्य महामंडळ सल्लागार समितीवर नियुक्ती
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
बुलडाणा जिल्ह्याचे भाजपा जिल्हा सचिव ॲड.सुनिल हसनराव देशमुख यांची भारतीय खाद्य महामंडळ भारत सरकारच्या राज्य सल्लागार समिती सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. उपभोक्ता मामले, खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
या आदेशावर भारत सरकारचे अपर सचिव अजय कुमार सिंह यांची डिजिटल स्वाक्षरी असून आदेश १० जुलै २०२५ रोजी कृषी भवन, नवी दिल्ली येथून जारी झाला आहे. या नियुक्तीमुळे ॲड.सुनिल देशमुख यांना राज्यातील खाद्य धोरणे आणि वितरण विषयक सल्लागार समितीत महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून यशस्वी कार्यकाळाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.