दे. राजा : (एशिया मंच न्यूज )
भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथा व राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साखला यांनी बीजेएस च्या कोअर कमिटीच्या सदस्यांसोबत चर्चा करून संपूर्ण भारतभर ज्या -ज्या ठिकाणी बीजेएस च्या शाखा आहेत त्या -त्या ठिकाणी तेथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वर्षभर महिना निहाय घ्यावयाचे फाउंडेशन प्रोग्रामचे नियोजन करून देण्यात आले.
संपूर्ण देशात बीजेएस चे पदाधिकारी व कार्यकर्ते वरिष्ठांच्या सुचनेनुसार फाउंडेशन प्रोग्राम घेत आहेत. देऊळगाव राजा शाखेच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांच्या वाढदिवसाचे औचित साधून पिंपळनेर परिसरात असलेल्या नगरपरिषद द्वारा संचलित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगरपरिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले. आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागते ही भावना मनात ठेवून शाखाध्यक्ष पियुष खडकपूरकर व त्यांच्या टीमने फाउंडेशन प्रोग्राम अंतर्गत प्रारब्ध हा कार्यक्रम वाढदिवस म्हणून साजरा केला. शैक्षणिक साहित्य व मिठाई घेताना या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. या शाळेत शिक्षण घेणारे बहुतेक विद्यार्थ्यांचे पालक हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करून आपल्या पाल्यांना शिक्षण देत आहे. यावेळी बीजेएस चे सन्मती जैन, शाखाध्यक्ष (चॅप्टर अध्यक्ष) पियुष खडकपूरकर, सतेज डोणगावकर, अंकित वाटाणे, डॉ.रसिका पियुष खडकपूरकर, कोयल अंकित वाटाणे सह या शाळेचे मुख्याध्यापक आर.डी.राठोड, सहायक शिक्षक सु.वि.इंगळे, एस. एल. मुंदानकर, अंगणवाडीच्या संगीता उखळकर, सुनंदा कपाटे, सुनीता म्हस्के ,सोनाली पाटोळे, जिनाईन कंपनीचे माधव गिते, अनिता संजय लोखंडे, सविता कृष्णा लोखंडे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजू वसंता कांबळे, राजू शिवाजी नाडे, दत्तात्रय टकले, संजय दंडे, रमेश पाटोळे उपस्थित होते.