महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ जनसंवाद धम्म ध्वज यात्रा 22 ऑगस्टला बुलढाण्यात

महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ जनसंवाद धम्म ध्वज यात्रा 22 ऑगस्टला बुलढाण्यात
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ जनसंवाद धम्म ध्वज यात्रेचे  शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी  बुलढाण्यात आगमन होणार आहे. यासंबधी माहिती देण्यासाठी  १९ ऑगस्ट रोजी स्थानिक पत्रकार भवन येथे बुलढाणा शहर समन्वय समितीच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

         यावेळी मिलिंद वानखडे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करतांना सांगितले की, अनेक वर्षांपासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा सुरू आहे. लढाई गल्ली ते दिल्ली आणि न्यायालयामार्फत हक्काचे, अधिकार प्राप्त करण्यासाठी सुरू आहे. अनागारिक धम्मपाल यांनी सुरू केलेला हा लढा पुढे पूज्य भंते सुरई ससाई नागार्जुन यांनी जिवंत ठेवला. अनेक वर्षांनंतर आकाश लामा, भंते विनाचार्य, भंते केके राहुल, भंते सुमित रत्न यांच्या प्रमुख नेतृत्वात हा लढा पुन्हा सुरू झाला आहे. या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा जाहीर केला. अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन सहभागी झाले.

        बी.टी. अॅक्ट १९४९ निरस्त करण्यासाठी बोधगया महाबोधी  महाविहार मुक्त आंदोलनाचे मुख्य संयोजक भंते विनाचार्य यांचा जनसंवाद महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर दिक्षाभुमी येथून सुरु होणार असून महाबोधी महाविहार मुक्ती लढा अजून तीव्र गतीने करण्यासाठी या धम्म ध्वज यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिक्षाभुमी ते चैत्यभुमी पर्यंत पहिल्या टप्प्यातील धम्म ध्वज यात्रेचे बुलढाण्यात शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी महाबोधी बुध्द विहार धम्मगिरी येथे सकाळी १० वाजता धम्म ध्वजारोहन पुज्य भंते यांच्या हस्ते होणार आहे. समता सैनिक दलातर्फे मानवदंना देण्यात येणार आहे. त्यानंतर धम्म ध्वज यात्रा दुपारी १२.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील महापुरूषांच्या पुतळ्यांना यशसिध्दी सैनिक सेवा संघ बुलढाण्याच्यावतीने मानवंदना देण्यात येणार आहे. पुढे ही धम्म ध्वज यात्रा जयस्तंभ चौक मार्गे मेन मार्केट लाईन जनता, चौक कारंजा चौकात पोहचणार आहे. त्यानंतर गर्दे  वाचलनालयाच्या सभागृहात जनसंवाद सभा घेण्यात येणार आहे. या धम्म ध्वज यात्रा व जनसंवाद सभेच मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 
         या पत्रकार परिषदेला मिलिंद वानखडे, अशोक दाभाडे, संजय कस्तुरे, डी.आर. इंगळे, सुरेश सरकटे, विजय काळे, सुभाष साबळे, मंगल मिसाळ, जे.पी.वाकोडे, बावस्कर यांची उपस्थिती होती.