* शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन व्यक्त केली कृतज्ञता
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
युनेस्को जागतीक वारसा स्थळांमध्ये महाराष्ट्रातील 11 स्थळांचा समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रमोदी यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन केंद्रसरकार प्रती कृतज्ञता व्यक्त केलीआहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना शिवसेनेतर्फे देण्यात आली.
संयुक्त राष्ट्राची शैक्षणीक वैज्ञानिक आणि संस्कृतीक संघटना अर्थात युनेस्को ही सांस्कृतीक किंवा नैसर्गीक वारसासाठी उत्कृष्ट वैश्विक मुल्य असलेल्याजागतीक वारसा स्थळांचा समावेश यादीमध्ये करत असते. हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तीत्वाशी निगडीत असलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश येनेस्कोच्या 2024-25 जागतीक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यासाठी केंद्रसरकारच्या वतीने प्रस्ताव पाठविण्यात आले होते. जागतीक वारसा स्थळांमध्ये भारतातील 12 स्थळांचा समावेश नुकताच करण्यात आला आहे. यातील 11 स्थळे हे महाराष्ट्रातील आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तीत्वाशी निगडीत साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा विजयदुर्ग, सिंधुदूर्ग या किल्ल्यांचा समावेश जागतीक वारसा स्थळांमध्ये नुकताच समावेश करण्यात आला आहे. ही महाराष्ट्रातील प्रत्येकांसाठी गौरवाची बाब आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील या एैतीहासीक वैभवाची दखल घेतल्याबद्दल नरेंद्र मोदी यांची आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेवुन कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आले. या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे नेते तथा केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव, शिवसेनेचे गटनेते खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे प्रतोद खासदार श्रीरंग अप्पा बारणे, खासदार नरेश म्हस्के, खासदार रविंद्र वाईकर, खासदार मिलींद देवरा, खासदार धैर्यशिल माने यांचा समावेश होता.