जिल्ह्यात अतिवृष्टीने बळीराजा हवालदिल* प्रशासनाने अतिवृष्टी बाधितांचे पंचनामे करुन तात्काळ मदत द्यावी : अमोल रिंढे पाटील

जिल्ह्यात अतिवृष्टीने बळीराजा हवालदिल
* प्रशासनाने अतिवृष्टी बाधितांचे पंचनामे करुन तात्काळ मदत द्यावी : अमोल रिंढे पाटील 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         मुसळधार व ढगफुटी सदृश पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. अनेकांची घरे पाण्याखाली गेली असून, शेतजमिनी व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अनेक रस्ते व पुल वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे जनजीवन ठप्प झालेले आहे. प्रशासनाने अतिवृष्टी बाधितांचे पंचनामे करुन तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी बुलढाणा मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी केली आहे.

        जिल्ह्यात रविवारी, सोमवारी रोजी झालेल्या पावसामुळे हजार हेक्टरवरील सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.अनेक घरांमध्ये 6-7 फूट पाणी साचून अन्नधान्य, कपडे, आवश्यक साहित्य पूर्णपणे भिजून खराब झाले आहे. हा पाऊस केवळ घरे आणि मालमत्तेपुरता थांबलेला नाही, तर सामान्यांच्या दैनंदिन आयुष्य यामुळे कोलमडले आहे. भारतीय हवामान विभागाने बुलढाणा जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवल्याने पुणे जिल्ह्यात नुकसानीचा आकडा वाढणार आहे. तरी सरकारने तातडीने अतिवृष्टीबाधित कुटंबियांना अत्यावश्यक साहित्य युध्दपातळीवर वितरित करावे, या गंभीर परिस्थितीत प्रशासनाने तातडीने मदत व पुनर्वसनाची ठोस कार्यवाही करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी अमोल रिंढे पाटील यांनी केली आहे.