बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता शाळकरी विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याची आणि शाळेत आलेल्या विद्यार्थ्याना सुखरूप घरी पोहोचवण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना सोबत आपत्ती व्यवस्थापन विभागाचं पथक सतर्क ठेवाण्याच्या आणि नदीकाठच्यागावांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे तर हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे. 18 ऑगस्टच्या सकाळपासूनच जिल्ह्यत पाऊस सुरू आहे. सकाळीच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला जिल्ह्यातील पाणी परिस्थितीची माहिती जाणून घेतली. अतिवृष्टीचा हवामान खात्याने दिलेला इशारा लक्षात घेता परिस्थितीनुसार शाळांना सुट्टी द्यावी, विद्यार्थी शाळेत आलेले असतील तर त्यांना सुखरूप घरपोच सोडण्याची व्यवस्था करण्यात यावी. या संदर्भात संबंधित विभागातील गटविकास अधिकारी व तहसीलदारांना सूचित करावे. आपत्ती विभागाचे पथक ही अलर्ट मोडवर ठेवावेत नदीकाठच्या गावाकडे विशेष लक्ष ठेवाण्याच्या सूचनाही यावेळी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना दिल्यात.