बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची 17 ऑगस्ट रोजी मलकापूर संग्रामपूर व जळगाव जामोद तालुका आढावा बैठक घेण्यात आली. दरम्यान तीनही तालुका अध्यक्षांची नियुक्ती करून नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली.
संघटनेचे राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे, जिल्हाध्यक्ष किशोर पवार, जिल्हा सचिव विठ्ठल पाटेखेडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष सातव, कार्यकारिणी सदस्य गजानन हुडेकर यांच्या उपस्थितीत बैठकी झाल्या. यावेळी बुलढाणा जिल्हा सहसंघटकपदी सुधीर दाते, मलकापूर तालुकाध्यक्ष संजय उमाळे, संग्रामपूर तालुकाध्यक्ष शामलकुमार कौलकार,जळगाव जामोद तालुकाध्यक्ष तुषार आसोलकर यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मलकापूर कार्यकारिणीत दिगंबर किनगे सरचिटणीस, अनिल खर्चे संघटक, विनोद क्षीरसागर सचिव, श्रीकृष्ण सोनोने कार्याध्यक्ष, सुभाष सपकाळ व मिलिंद बगाडे सहसंघटक, राजेश टप सहसचिव, प्रवीण राणे, प्रवीण बगाडे व सुनील चौधरी उपाध्यक्ष ,विष्णू चोपडे प्रसिद्धीप्रमुख, शंकर बोंडे सहसंघटक, प्रमोद वानखडे सह प्रसिद्धीप्रमुख, गणेश बोचरे सदस्य, तर जळगाव जामोद मध्ये अनिल ढगे सरचिटणीस, शेख मुजम्मील शेख इस्माईल संघटक, शेख रहीम शेख रउफ प्रसिद्धीप्रमुख
तसेच संग्रामपूर मध्ये अनिल धनभर सहसंघटक, संजय दामधर कार्याध्यक्ष, देविदास बावस्कार सहसचिव, श्रीधर धुरडे व शंकर बगाडे उपाध्यक्ष, गोपाल अमृतकर सचिव,श्रीकृष्ण इघोकार सरचिटणीस, मधुकर ढगे प्रसिद्ध प्रमुख, गोपाळ ढगे सहसंघटक, राजेश बोडखे संघटक म्हणुन नियुक्ती करण्यात आली. यावेळी निळकंठ चिकाटे व इतरही ओबीसी कर्मचारी यांची उपस्थिती होती.