* पालकमंत्री ना.मकरंद आबा पाटील यांचा धडाकेबाज निर्णय
देऊळगाव राजा : (एशिया मंच न्यूज )
स्थानिक अंढेरा येथील आदिवासी बांधवांचा गेल्या पंचवीस वर्षापासून प्रलंबित असलेला घरकुलाचा प्रश्न अखेर आमदार मनोज कायंदे यांच्या आग्रही मागणीमुळे व पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या धडाकेबाज निर्णयाने सुटला असून आदिवासी बांधवांच्या घरकुलासाठी वन विभागातील जवळपास पाच एकर जमीन घरकुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अंढेरा येथे पारधी समाजाची लोकसंख्या जवळपास एक हजाराच्या वर असून जागेअभावी पारधी समाज बांधव हे घरकुला च्या लाभापासून वंचित राहत होते. पारधी समाज बांधव हे वन विभाग हद्दीत राहत आहेत, त्यामुळे त्यांना अडचण येत होती. मागील 25 वर्षांपासून पारधी समाज बांधव आग्रहाने घरकुलासाठी वनविभागाकडे चकरा मारत होते व अनेक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारकडे आपली दाद मागत होते. पण आज पर्यंत ते आपल्या हक्काच्या घरापासून वंचित होते. नेमकी हीच अडचण भगवान मुंढे व प्रा. दिलीप सानप यांनी आ. मनोज कायंदे यांचे कडे मांडली.
मागील महिन्यात पालकमंत्री मकरंद आबा पाटील हे जिल्ह्यात आले, तेव्हा आ.मनोज कायंदे यांनी हा घरांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती पालकमंत्री यांचे कडे केली. तेव्हा ना.पाटील यांनीही अंढेरा येथे पारधी पाड्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व सर्व कायदेशीर सोपस्कार बाजूला ठेवून तात्काळ पारधी समाज बांधवास जागा उपलब्ध करून द्यावी, असे संबधित विभागास आदेश दिले.
1 ऑगस्ट ला महसूल दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ना. पाटील यांनी निर्णय घेऊन मंजुरी आदेशाची प्रतच यावेळी भगवानराव मुंढे, प्रा.दिलीप सानप, सुनील पवार, मल्हारी भोसले व गावकरी यांचे कडे सुपूर्द करण्यात आली. आ. मनोज कायंदे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले. सरकारी हद्दीतील गट न.13 मधील 1. हे 81 आर. जमीन जिल्हाधिकारी यांचे आदेशाने घरकुलासाठी मिळाली. यावेळी सर्व पारधी समाजाने ना.मकरंद पाटील व आ.मनोज कायंदे यांचे आभार मानले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात ना. मकरंदआबा पाटील, आ. मनोज कायंदे, आ. संजय गायकवाड, आ.सिद्धार्थ खरात, उपविभागीय अधिकारी सि.राजा, तहसीलदार दे. राजा, भगवान मुंढे, प्रा. दिलीप सानप, नितीन कायंदे, गजानन काकड, दिपक चेके सुनील पवार, उदरू भोसले, मल्हारी भोसले यांचे सह पारधी समाज बांधव उपस्थित होते.