बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. त्याला आर्थिक हातभार देण्याच्या दृष्टिकोनातून करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान योजना सुरू केली. ही केंद्र सरकारची शेतकरी प्रति असलेली बांधिलकी असल्याचे प्रतिपादन केद्रीय आयुष आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना व्यक्त केले.
पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज 2 ऑगस्ट रोजी वितरित करण्यात आला. त्यानिमित्य वाराणसी येथे मुख्य कार्यक्रम संपन्न झाला तर बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्र येथे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थित एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव बोलत होते. यावेळी व्यासपिठावर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. झापे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, प्रकल्प संचालक आत्मा पुरुषोत्तम उन्हाळे, युवासेना नेते कुणल गायकवाड उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करता यावे. वेळेवर त्यांना पैसा उपलब्ध व्हावे, या दृष्टिकोनातून पीएम किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली आहे ही योजना देशातील अन्नदात्याच्या कष्टाचा हा सन्मान करणारी आहे. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी आर्थिक मदत होते. शेतीमध्ये लागणारे बी-बियाणासाठी या रकमेचा उपयोग होतो, ही शेतकऱ्यांसाठी लाभदायी योजना असल्याचे ही त्यांनी सांगितले. याशिवाय केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविते, त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन आपली आर्थिक उन्नती करावी, असे आवाहन केद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.या कार्यक्रमाला शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* शेतकऱ्यांसोबत बसून ऐकलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण :
किसान सन्मान योजनेचा विसावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज वितरित करण्यात आले. त्या निमित्य वाराणसी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितीना संबोधीत केले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बुलढाणा येथे झालेल्या कार्यक्रमात दाखविण्यात आला. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या सोबत बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण एलेडी स्क्रीनवर ऐकले. आपण प्रथम शेतकरी आहोत नंतर मंत्री याचा प्रत्यय भूमिपुत्र केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या साध्या वर्तनातून दिला.