* चिखली येथे आयोजन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
शिवसेनेच्या संघटनात्मक दृष्टिकोनातून चिखली विधानसभा मतदार संघातील शिवसेना युवा सेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत 3 ऑगस्ट रोजी चिखली येथे आयोजित करण्यात आली आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा संघटनात्मक आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली चिखली येथील मकरध्वज खंडाळा रोड स्थित असलेल्या राधाबाई खेडेकर विद्यालयात दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. याबैठकीला शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा आमदार संजय गायकवाड, माजी आमदार संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर , जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, प्रा. बळीराम मापारी ,युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के उपस्थित राहणार आहेत. चिखली येथे होणाऱ्या या बैठकीला शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, निलेश गुजर, तालुकाप्रमुख गजानन मोरे, धनंजय बारोटे यांनी केले आहे.