* नदीम शेख यांची पालकमंत्री ना.पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
शहरातील इकबाल नगर येथील रस्त्यांचे बांधकाम व ठेकेदारा मार्फत दररोज साफसफाई करण्याची मागणी पालकमंत्री यांच्याकडे अल मदिना एज्युकेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांनी 2 ऑगस्ट रोजी बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले.
नदीम शेख यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मागील तीन ते चार वर्षापासुन नविन पाण्याची पाईप लाईनच्या नावाखाली इकबाल नगर, टीपु सुलतान चौक, जोहर नगर, मदिना मस्जिद रोड इत्यादी ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले होते. परंतु दुर्दैव असे कि, खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. यामुळे मागील अनेक वर्षापासुन इकबाल नगर येथे राहणारे नागरीकांना खुप त्रास सहन करावा, लागत आहे. अनेक वेळा निवेदन, तक्रार अर्ज व आंदोलन सुध्दा करण्यात आले परंतु अद्यापही कुठलीच कार्रवाई केली गेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर इकबाल नगर येथे रस्त्यांचे भुमिपुजन करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात काम सुरू का झाले नाही असा प्रश्न नागरीकांकडुन उपस्थित केला जात आहे. यासह मागील महिन्यापासुर अकोला येथील कुमुदिनी कंपनीला बुलढाणा शहराची साफसफाईची जबाबदारी देण्यात आली.
सुरूवातीच्या काळात संबंधीत ठेकेदाराकडुन इकबाल नगर येथे आठवडाभर दररोज सफाई करण्यात आली परंतु एक आठवड्यानंतर इकबाल नगर येथे पुर्णत सफाईचे काम ठेकेदारानी बंद केले. तरी टिपु सुलतान चौक ते मिर्झा नगर, टिपु सुलतान चाटैक ते दारूस्सलाम मस्जिद पर्यंत, राजा मेंबर ते केमला रोड, मदिना मस्जिद रोडसह अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम करण्यात यावे. तसेच ठेकेदाराकडुन इकबाल नगरची सफाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तार कुरेशी, नवाज मिर्झा, शेख फरदीन यांची उपस्थिती होती.