क्रांतिकारी सह चांडोळ वासियांनी घरकुल लाभार्थ्यासाठी दिला उपोषणाचा इशारा* जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन; हक्काच्या घरासाठी पुकारणार आंदोलन

क्रांतिकारी सह चांडोळ वासियांनी घरकुल लाभार्थ्यासाठी दिला उपोषणाचा इशारा
* जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन; हक्काच्या घरासाठी पुकारणार आंदोलन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          चांडोळ येथील गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या चांडोळ गावातील गरीब व गरजू नागरिकांनी आता संघर्षाची भूमिका घेतली आहे. गावातील क्रांतिकारी विचारांचे तरुण व ज्येष्ठ नागरिक एकत्र येत प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात आवाज उठवत आहेत. शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी उपोषणाचा इशारा दिला असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

          चांडोळ गावात अनेक कुटुंबे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कच्या झोपड्यांत, पावसात गळती होणाऱ्या छपराखाली राहत आहेत. काही कुटुंबांकडे तर स्वतःची जागा देखील नाही. शासनाकडून वारंवार आश्वासने मिळूनही अद्यापपर्यंत प्रत्यक्षात कोणताही लाभ मिळालेला नाही, ही बाब अत्यंत खेदजनक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून इ क्लास जागेत काही कुटुंब राहत असून नियमित पने ग्रामपंचायत चा कर (पाणीपट्टी आणि घरपट्टी) ते भरत आहे परंतु शासनाच्या जाचक अटीमुळे त्यांना गरजू असताना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही निवेदनात ग्रामस्थांनी सुचवले आहे की गावातील शासकीय मालकीच्या काही ई-क्लास जागा रिकाम्या असून, त्या जागेवर शासनाने गरजू लाभार्थ्यांसाठी घरे उभारावी. ही जागा स्थानिक प्रशासनाच्या अखत्यारीत असून, तातडीने कारवाई केल्यास अनेक कुटुंबांना कायमस्वरूपी निवारा मिळू शकतो.
         गरिबांचे हक्काचे घर ही केवळ घोषणा न राहता, ती प्रत्यक्ष कृतीत उतरली पाहिजे. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा क्रांतिकारी चे अमोल मोरे सह चांडोळ वासियांनी दिला आहे.


         चांडोळ वासियानी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन यासंदर्भात लेखी निवेदन सादर केले आहे. यामध्ये त्यांनी घरकुल मंजुरी, ई-क्लास जागेचा वापर, तसेच लाभार्थ्यांची पात्रता सूची तातडीने जाहीर करण्याची मागणी केली आहे.         जर लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास, चांडोळ येथील लाभार्थी , जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा ठाम इशारा या निवेदनात दिला आहे. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमोल मोरे यांच्यासह  मोठ्या संख्येने चांडोळ चे लाभार्थी उपस्थित होते .