* लाभार्थ्यांची होणार पडताळणी : अमोल डिघुळे
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्य शासनाने घाई गडबडीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली परंतु आता या योजनेचा अतिरिक्त भार शासनाच्या तिजोरीवर पडत असल्याची ओरड होत आहे. या योजनेतील लाभार्थी कमी करण्यासाठी शासन विविध उपाय करत आहे, त्यामुळे 65 वर्षावरील आणि एका परिवारातील 2 पेक्षा जास्त लाभार्थींचा लाभ बंद करण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील या दोन्ही अटीत बसणारे एकूण 51 हजार 430 लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता थांबविण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री मंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात एकूण 6 लाख 11 लाभार्थी आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार एका कुटुंबातील फक्त 2 महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात तसेच लाभार्थी महिलांचा वय 21 ते 65 वर्ष असले पाहिजे. शासनाच्या ही बाब निदर्शनास आली की, एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिला आणि 65 वर्षावरील महिला सुद्धा लाभ घेत आहे. या दोन्ही अटींचा भंग करणाऱ्या लाभार्थी महिलांचा शोध घेण्याची निर्देश राज्य शासनाने महिला व बालविकास विभागाला दिले आहे. बुलढाणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त 39 हजार 267 लाभार्थी महिला मिळून आले आहे. तसेच 65 वर्षवरील वय असलेले 12 हजार 133 महिला मिळून आले आहे. अशा प्रकारे 51 हजार 430 लाभार्थी महिलांचे अनुदान थांबविण्यात आले असून याची पडताळणी केली जात आहे.
* एक ही पुरुष लाभार्थी नाही :
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत काही पुरुषांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याची सुद्धा राज्य पातळीवर पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा एकही पुरुष लाभ घेत नसल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल दिघुळे यांनी दिली आहे. ज्या महिलांचे अनुदान खात्यात येत नसेल त्यांनी आपल्या तालुक्यातील महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधून आपले कादगपत्रांची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.