* पेनटाकळी प्रकल्पातील पाणी पाझरामुळे नुकसान झालेल्या उर्वरीत 109 शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई…!!
* विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीत झाला निर्णय
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
पेनटाकळी प्रकल्पातील पाणी पाझरामुळे नुकसान झालेल्या पणअहवाल यादीतुन सुटलेल्या तब्बल 109 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा महत्वपुर्ण निर्णय विदर्भ पाटबंधारे नियामक मंडळाच्या बैठकीत झाला आहे. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कडे अनेक शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त अहवाल यादीत नांव नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या . या तक्रारींची दखल घेत त्यांनी संबधित विभागाला सुचित केले होते. त्यांनुसार निर्णय घेण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्हयातील पेनटाकळी प्रकल्पातील मुख्य कालवा अंतर्गत येणाऱ्या 0 ते 11 मधील शेतकऱ्यांचे पाणी पाझरामुळे नुकसान झाले होते. परंतु नुकसान अहवाल यादीमधुन काही शेतकरी सुटले होते. या शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे या संदर्भांत तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार संबधित विभागाला या संदर्भांत सुचित केले होते.
जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाची बैठक 5 ऑगस्ट रोजी संपन्न झाली. या बैठकीत पेनटाकळी प्रकल्पाच्या मुख्य कालवा कि. मी. ० ते ११ मधील पाणी पाझरामुळे झालेल्या नुकसान एकुण-१०९ शेतक-यांचे एकुण ६६.२७ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात येऊन एकूण किंमत रु. ८६,४८,२३५/- एवढ्या रक्कमेचा नुकसान भरपाईचा प्रस्तावास नियामक मंडळाची मान्यता देण्यात आली आहे.
* यापुर्वीही 5.39 कोटींची शेतकऱ्यांना मिळाली नुकसान भरपाई :
पेन टाकळी प्रकल्पातील मौजे-दुधा व रायपुर या शिवारातील शेतजमीनीत जास्त प्रमाणात पाझर आढळुन आला, त्यामुळे पाझराबाबत शेतक-यांच्या तक्रारी येत गेल्याने ना प्रतापराव जाधव यांनी मुख्य कालव्याच्या पाणी पाझरामुळे झालेल्या नुकसानीचा सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाईचा प्रस्ताव सादर करण्याबाबत सुचविले होते.
त्या अनुषंगाने संयुक्त नुकसानीचा अहवाल दि. २१/०५/२०२१ रोजी तयार करण्यात आला. सन २००३ ते २०२० पर्यंत ज्या वर्षी कालव्याव्दारे सिंचन झाले त्यावर्षीचा नुकसान भरपाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला. सदरच्या नुकसान भरपाईची परिगणना करतांना महसुल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार करण्यात येउन संपुर्ण प्रस्ताव मंजुरीस्तव शासनास सादर करण्यात आला.
सदर नुकसान भरपाईच्या प्रस्तावास नियामक मंडळाच्या ठराव क्रं. ८२/१७ नुसार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपुर अंतर्गत पेनटाकळी प्रकल्प ता. मेहकर जि. बुलढाणा या प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून होणा-या पाण्याच्या पाझरामुळे सन २००३ ते २०२० या कालावधीत कालव्या लगतच्या मौजे-पेनटाकळी, दुधा, रायपुर व पांचला ता. मेहकर या चार गावाच्या शिवारातील एकुण ४३२.१५ हेक्टर बाधीत झालेल्या क्षेत्राकरिता रु. ५.३९ कोटी रुपये एवढया रकमेस नियामक मंडळाची मंजुरात प्राप्त झालेली असुन, सदरचा निधी प्राप्त झाल्याने आजपावेतो जवळपास ९८ % खातेदारांस नुकसानीचा मोबदला या विभागा मार्फत अदा करण्यात आलेला आहे. या नुकसान भरपाई वाटपातुन सुटलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भांत नव्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार पेनटाकळी प्रकल्पाच्या मुख्य कालवा कि. मी. ० ते ११ पर्यंत सन २००३ ते २०२० पर्यंत सिंचनाकरिता पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे कालव्या लगतच्या मौजे- पेनटाकळी, दुधा, रायपुर, सोनार गव्हाण सावत्रा, टाकरखेड व पांचला या ७ गावांमधील शेतक-यांचे पाणी पाझरामुळे काही क्षेत्र बाधीत होत आहे. सदर बाधीत होत असलेल्या शेतक-यांच्या प्राप्त अर्जानुसार याधीत नुकसानग्रस्त शेतकरी यांचे समवेत ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक व जलसंपदा विभागांचे अभियंता पानी संयुक्तपणे प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर जाऊन सविस्तर सर्वोक्षण करुन बाधीत झालेले क्षेत्र अंतिम करण्यात आले होते त्यामध्ये उपरोका ७ गावांमधील पाणी पाझरामुळे नुकसानग्रस्त एकुण १०९ शेतक-यांचे एकुण ६६.२७ हेक्टर क्षेत्र बाधीत झालेले आहे. सन २००३ ते २०२० पर्यंत ज्यावर्षी सिंचन करण्यात आले, त्यावर्षाचा नुकसान भरपाईचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. सदरच्या नुकसान भरपाईची परिगणना करतांना महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार करण्यात येऊन बाधीत क्षेत्राच्या मुल्यांकनाची एकुण किमत रु. ८६,४८,२३५/- एवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे.
नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना 109 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.