महादेवी (माधुरीला) परत नांदणी मठात आणण्यासाठी जैन समाजासोबत एक वटला अजैन समाज* मूक मोर्चा काढून निषेध नोंदवत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

महादेवी (माधुरीला) परत नांदणी मठात आणण्यासाठी जैन समाजासोबत एक वटला अजैन समाज
* मूक मोर्चा काढून निषेध नोंदवत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
 दे. राजा : (एशिया मंच न्यूज )
       कोल्हापूर जिल्ह्यातील जैन समाजाच्या नांदणी येथील जैन मठामध्ये गेल्या 35 वर्षापासून महादेवी (माधुरी) नावाची हत्तीण सर्वांच्या मनोरंजनाचे साधन म्हणून सर्व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत होती. नित्यनेमाप्रमाणे दररोज भगवंतांची पूजा अर्चा सुद्धा एक मुका प्राणी करत होता. सदर महादेवी हत्तींनी यास META या संस्थेने चुकीचा अहवाल तयार करून या महादेवीच्या भविष्यातील सुरक्षिततेसाठी गुजरात स्थित जामनगर मध्ये अनंत मुकेश अंबानी यांनी निर्माण केलेल्या वनतारा या प्राणी संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून आदेश पारित करून घेतले. या न्यायालयीन प्रकरणी जैन समाजाच्या भावनांना फार मोठी ठेच पोहोचली असून महाराष्ट्रासह भारतभर सकल जैन व अजैन समाजाकडून महादेवी (माधुरी) हत्तीन परत नांदणी मठांमध्ये म्हणजेच तिच्या माहेरी आणण्यासाठी एकवटले असून ठीक ठिकाणी मोर्चे मूक मोर्चे, निषेध मोर्चे काढण्यात येऊन केंद्र सरकार व राज्य सरकारला निवेदनाद्वारे आपल्या भावना व्यक्त करत आहेत. 
      3 ऑगस्ट रोजी शहरात सकल जैन समाजाचे वतीने मूक मोर्चाचे आयोजन केले होते. यामध्ये जैन समाजासोबत अजैन समाजातील नागरिकांनी उपस्थिती लावून सर्वांच्या भावनांचा आदर करण्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारा मार्फत देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनावर एक हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात नमूद आहे की, तुम्हाला जैन समाजाबाबत सखोल अभ्यास असून जैन धर्मिय बंधू कुठल्याही प्राणी बद्दल आस्था, करूणा, दया भावाने वागतात तसेच या धर्माच्या शिकवणीमध्ये कुठल्याही प्राण्याला त्रास देण्याची किंवा त्यांना पाळण्याची मुभा नाही. या देशात 14000 गो शाळेचे संचलन हे जैन समाजातर्फे करण्यात येते. मागील 40 वर्षापासून महादेवी (माधुरी) ही हत्तींनी नांदणीच्या जैन मठामध्ये राहत होती. ती केवळ एक प्राणी म्हणून नव्हे तर एक श्रद्धेचा प्रेमाचा व संस्कृतीचा भाग आहे. ती एक जैन समाजाची धार्मिक प्रतीक आहे. जैन समाजाच्या सर्व धार्मिक कार्यक्रमात तिचा सहभाग असायचा असे असताना समाजाला व मठाधिपती यांना अंधारात ठेवून PETA या संस्थेने या माधुरीबद्दल चुकीचा अहवाल तयार करून सुप्रीम कोर्टात पाठवला त्या अहवालावरून न्यायालयाने त्या माधुरीच्या पुढील संगोपनासाठी गुजरात स्थित जामनगर येथील अनंत मुकेश अंबानी यांनी निर्माण केलेल्या वनतारा या प्राणी संग्रहालयामध्ये प्रशासनाला सोपवण्याचे आदेश पारित केले. हा निर्णय जैन व अजैन समाजा च्या मनावर आघात करणारा ठरला आहे, त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून वन तारामध्ये पोहोचलेली महादेवी (माधुरी) आणण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी ठीक ठिकाणी जैन व अजैन मंडळीकडून निवेदन देण्यात येत आहे.  शहरातील जैन व अजैन मंडळी कडून शांततेत मूक मोर्चा काढून राज्याचे मुख्यमंत्री यांचे नावे तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले. या मूक मोर्चात सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.