शिव महापुराण कथा मनोरंजन साधन नाही - बालसंत श्री दिपशरणजी महाराज

शिव महापुराण कथा मनोरंजन साधन नाही - बालसंत श्री दिपशरणजी महाराज 
बुलढाणा :  (एशिया मंच न्यूज )
             संततीमुळे विचार आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू येत असतील तर ईश्वर सुद्धा माफ करणार नाही. कर्माची फळे भोगावीच लागतील, म्हणून कथेतून काही संस्कार घ्यावे व अमंलात आणावे, म्हणून कोणतेही सत्संग किंवा शिवमहापुराण कथा केवळ मनोरंजनाचे साधन नाही, असे प्रतिपादन बालसंत श्री दीप शरणजी महाराज यांनी शिवमहापुराण कथेचे सहावे पुष्पगुंतांना केले. आज युवा सेनेचे प्रमुख नेते कुणाल गायकवाड यांनी दीपशरण महाराजांचे पूजन करून माल्याअर्पण केले. यावेळी चंपालाल शर्मा आणि सिद्धार्थ शर्मा यांनी कुणाल गायकवाड यांचा हार घालून सन्मान केला. 
        आजच्या दिवसाचे व्यवस्थापक गुरव समाज महिला मंडळ व लेवा पाटील सखी यांच्याकडे होते. व्यासपीठ तयारी ज्योतिर्लिंग सजावट आरती व महाराजांचे स्वागत हे सर्व कामे या महिला मंडळाकडे होते. प्रसाद वितरण परशुराम ब्राह्मण समाज महिला मंडळांनी केले. सौ. माधुरी घोरपडे ,सुनंदा कावळे, नलिनी शिंदे, मंगला इंगळे ,कुसुम चिंचोळकर, कुंदा पाटील ,अंबिका काटकर, नयना पाटील, यांनी व्यासपीठावर दीपशरण महाराजांचे पूजन केले व माल्यार्पन केले, नंतर आरती केली .महाराजांनी कथेचा विस्तार करताना आई-वडील मुलांसाठी किती वेदना सहन करतात परंतु तीच मुले मोठी झाल्यावर आई-वडिलांना दुःख देतात व अश्रू काढायला लावतात .आईचे महत्व सांगताना महाराजांनी ओ माॅं तू कितनी अच्छी है हे गीत म्हटले तेव्हा श्रोत्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. 
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाशचंद्र पाठक यांनी केले महाप्रसादाचे मुख्य यजमान रामनिवास यादव हे कुटुंब आहे. सौ. मीना व श्री रामनिवास यादव यांनी पूर्ण खर्च केला.