वारकरी संप्रदायाचे पाईक असलेल्या कीर्तनकारांचा सन्मान करण्याची संधी मिळणे हे मोठे भाग्य - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

वारकरी संप्रदायाचे पाईक  असलेल्या कीर्तनकारांचा सन्मान करण्याची संधी मिळणे हे मोठे भाग्य - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव 
बुलढाणा :  (एशिया मंच न्यूज )
        वारकरी संप्रदायाचे पाईक आणि सन्मार्गाचे पथदर्शक असलेल्या कीर्तनकारांचा सन्मान करण्याची संधी मिळणे हे मोठे अहोभाग्य मला 
प्रा.डॉ.सचिन जाधव यांच्या त्यांच्या मित्र मंडळा तर्फे मला मिळले,  असे प्रतिपादन केंद्रीय आयुष, आरोग्य,  कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले.
        मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील भूमिपुत्र प्रतापराव जाधव शेतकरी भवनात गजर कीर्तनाचा सन्मान कीर्तनकाराचा हा आगळावेगळा व कृतज्ञता व्यक्त करणारा सोहळा प्राध्यापक सचिन जाधव मित्रपरिवाराच्यावतीने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज 10 ऑगस्टला शेगाव येथे केले होते. केंद्रीय मंत्री यांनी सर्वप्रथम गोमातेचे पूजन केले. फटाक्यांची आतिषबाजी करत जिल्ह्यातील ३५० कीर्तनकारांचे
 भावपूर्ण स्वागत करण्यात आले.      यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दिढे मामा , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बळीभाऊ मापारी, विजयराव जाधव, बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, राजश्रीताई जाधव, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव, खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष शत्रुघ्न निकम , मनोज सावजी, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेशतात्या वाळूकर, लोणारचे भगवानराव सुलताने, शहर प्रमुख जयचंद बाठीया ,पांडुरंग सरकटे, समाधान साबळे, युवासेनेचे भूषण घोडे प्रामुख्याने उपस्थित होते.
            ३५० कीर्तनकारांना विठ्ठल पांडुरंगाची मूर्ती, स्मृतिचिन्ह आणि वस्त्रे देऊन प्रतापराव जाधव , संजय रायमुलकर, ऋषिकेश जाधव , प्रा.डॉ.सचिन जाधव यांच्याहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. शंभर जोडप्यांच्या हस्ते सर्व कीर्तनकारांचे पूजन करण्यात आले. कीर्तनकार आणि उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.गजानन घायाळ यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन जाधव मित्र मंडळाचे संतोष चनखोरे, जीतुभाउ सावजी, कैलास जाधव, गजेंद्र मापारी, सागर जाधव, संदीप मेटांगळे, युवराज वाघ,  पांडुरंग मुंडे ,कैलास राऊत , रामेश्वर निकम, ऍड. रामेश्वर पळसकर, गजानन निकम, प्रवीण जाधव, ललित रहाटे ,अरुण गीते, मोहन बोडखे यांनी परिश्रम घेतले.