शेतकऱ्यांना सन 2024-25 खरीप हंगामासाठी 14 कोटी 24 लाखाची नुकसान भरपाई मंजूर * केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

शेतकऱ्यांना  सन 2024-25 खरीप हंगामासाठी 14 कोटी 24 लाखाची नुकसान भरपाई मंजूर 
* केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन 2024-25 खरीप हंगामातील 6607 जिल्हयातील शेतकऱ्यांना 14 कोटी 24 लाख 11 हजार 231 रुपये मंजुर झाले आहे. आजपासुन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मंजुर झाली आहे. या खरीप हंगामातील उर्वरीत शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्यात मिळणार आहे. 
         प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन 2024-25 या खरीप हंगामातील पिक विम्याचे 14 कोटी 24 लाख 11 हजार 231 रुपये मंजुर झाले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासुन पिकविम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. जिल्हयातील अनेक शेतकरी सन 2024-25 च्या खरीप हंगामातील पिक विम्यापासुन वंचीत राहले होते. पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन पीक विम्याची रक्कम नुकसानी दाव्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहीजे, असे निर्देश पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे बुलढाणा जिल्हयातील सन 2024-25 खरीप हंगामातील 6607 शेतकऱ्यांना 14 कोटी 24 लाख 11 हजार 231 रुपये मंजुर झाले आहेत. 
       सन 2024-25 खरीप हंगामातील जिल्हयातील अनेक दावे अजुनही प्रलंबित आहेत. या प्रलेबित दाव्यासंदर्भात कृषी मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येत असुन ही प्रकरणेही मंजूर झाल्यानंतर नुकसानीच्या रकमेत वाढ होणार आहे. त्याचा फायदा बुलढाणा जिल्हयातील शेतकऱ्यांना होणार असल्याची माहीती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातुन देण्यात आली आहे.