नांदुरा शहरातील CA ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा बुलडाणा अर्बन बुलडाणा शाखा नांदुरा तर्फे सत्कार

नांदुरा शहरातील CA ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा बुलडाणा अर्बन बुलडाणा शाखा नांदुरा तर्फे सत्कार
नांदुरा : (एशिया मंच न्युज)
        महत्त्वाची व प्रतिष्ठेची समजली जाणारी CA परीक्षेचा अंतिम निकाल 6 जुलै रोजी जाहीर करण्यात आला. या परिक्षेत नांदुरा शहरातील फुटपाथवर पाणीपुरी, भेळ इत्यादी व्यवसाय करणारे रविंद्र द्वाराकादास शर्मा यांचा मुलगा जितेंद्र शर्मा हा मे 2025 मध्ये झालेल्या सिए च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला आहे, एका सामान्य पार्श्वभूमीतून आणि मर्यादित संसाधनामधून आलेल्या जितेंद्र याने कधीही परिस्थितीला आपले नशीब ठरवू दिले नाही. रात्रंदिवस दीर्घ अभ्यासाने आणि अथक परिश्रमाने त्याने ही CA हि प्रतिष्ठित पदवी मिळवली आहे. तसेच नांदुरा शहरातील प्रसिद्ध व्यापारी रोशनकुमार डागा यांचा मुलगा साहिल रोशनकुमार डागा हा सुद्धा सिए ची परीक्षा उत्तीर्ण झाला . 
     जितेंद्र शर्मा याचा सत्कार नांदुरा शाखेचे स्थानिक संचालक संतोषजी डोडिया यांनी केला तर साहिल डागा यांचा यांचा सत्कार नांदुरा शाखेचे स्थानिक संचालक ऍडव्होकेट मधुसूदनजी राठी यांनी केला. सदर सत्कार प्रसंगी बुलडाणा अर्बन बुलडाणा नांदुरा विभागीय व्यवस्थापक सचिन झंवर, शाखा व्यवस्थापक संदीप माहेश्वरी व कर्मचारी उपस्थित होते.