* चिमुकल्या निशांत ने काढली ईश्वर चिठ्ठी
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
शरद पाटील उपविभागीय अधिकारी तथा निरीक्षक यांचे अध्यक्षतेखाली विठ्ठल कुमरे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी बुलढाणा यांचे उपस्थितीत बुलढाणा तालुक्यातील 66 ग्रामपंचायतचे सरपंच आरक्षण आज 8 जुलै रोजी काढण्यात आले. सहा वर्षीय निशांत नितीन पाटील याने ईश्वरचिठठी काढली.
अनुसूचित जाती एकूण 12 जागा पैकी 6 महिलांसाठी राखीव, अनुसूचित जमातीच्या 3 जागा पैकी 2 जागा महिलांसाठी राखीव, नागरिकांचा मागास प्रवर्ग 18 जागा पैकी 9 जागा महिलांसाठी राखीव तसेच सर्वसाधारण च्या 33 गसरपंच पदाच्या 17 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहे.
यावेळी बुलढाणा तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच , उप सरपंच, , तलाठी, मंडळ अधिकारी व निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार शशिकांत वाघ, अव्वल कारकून सविता तायडे, महसूल सहाय्यक नितीन रिंढे, अजय राऊत तसेच महसूल सेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.