* बहूजन रत्न पुरस्कार सोहळा
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
समाजात बहुजन हितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा 'राज्यस्तरीय "बहूजन रत्न पुरस्कार" यंदा सामाजिक न्याय पत्रकारिता आणि जनजागृतीच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे आयोजन ऋणानुबंध सामाजिक विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. यंदाचा बहूजन रत्न पुरस्कार पत्रकार शब्दनायक वृत्तपत्र संपादक आदिल पठाण यांना प्रदान करण्यात आला.
त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक कार्यामुळे आणि बहुजन समाजाच्या महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यासाठी त्यांनी केलेले प्रखड लिखाण, मनुवादी व्यवस्थे विरुद्ध त्यांचे असलेले लिखाण ,जाती पतीच्या पलीकडे जाऊन समतेचा विचार पेरण्यासाठी त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांमुळे त्यांची निवड करण्यात आली.
पुरस्कार वितरण सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. पुरस्कार स्वीकारताना आदिल पठाण यांनी सांगितले की, हा पुरस्कार माझ्या साठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. माझ्या व मित्र परिवारासाठी गौरवाचा क्षण आहे, भविष्यात अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देणारा हा सन्मान आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून व्याख्याते कुणाल पैठणकर ,आंबेडकर चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते कैलास सुखदाने ,कार्यक्रमाचे संयोजक प्रशांत डोंगरदिवे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे, दैनिक लॉर्ड बुद्धाचे प्रतिनिधी मोरे' अॅड शिरसाट , दांडगे बामसेफचे गवई , सरदार साहेब, सचिन खंदारे, प्रशांत जैवाळ, मघाडे सर, ऋतिक बिहाडे, बाळू भिसे, निकाळजे सर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.