वक्फ बोर्ड औरंगाबद येथील अधिकारी यांच्यावर कारवाई करून हजरत मोहम्मद हनीफ मस्तान रहेमान सैलानी अनसिंग येथील स्कीमची फाईल रद्द करुन नव्याने तपास करा
* शेख जहीर यांची निवेदनाद्वारे मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
वक्फ बोर्ड औरंगाबद येथील अधिकारी यांच्यावर कारवाई तसेच हजरत मोहम्मद हनीफ मस्तान रहेमान सैलानी अनसिंग ता. जि.वाशिम येथील स्कीमची फाईल रद्द करुन नव्याने तपास करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे शेख जहीर यांनी 27 जून रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, हजरत मोहम्मद हनीफ मस्तान रहेमान सैलानी अनसिंग ता. वाशिम, जि. वाशिम नोंदणी क्र. MSBW/WSM/108/2017 या नोंदणीकृत संस्थेवर शब्बीर हुसैन मोहम्मद हुसैन रा. अनसिंग ता.जि. वाशिम हे देखरेख करीत होते. परंतु अर्शद सिद्दिकी म. कलीम सिद्दीकी व प्रणय देविदत्त शुक्ला यांची नांवे भोगवटदाराच्या नोंदणीमध्ये नोंद होती. ही माहिती शब्बीर हुसैन मोहम्मद हुसैन व इतर जणांना माहिती होताच त्यांनी तहसिलदार वाशिम, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद पानचक्की, औरंगाबाद येथे रितसर नोंदणीकृत संस्थेची माहिती देत अर्ज दाखल केला. सदर अर्जाची सुनावणी होऊन वरील दोन जणांची मालकी हक्क कमी करून भोगवटदाराच्या नोंदणीमध्ये हजरत मोहम्मद हनीफ मस्तान रहेमान सैलानी अनसिंग ता. वाशिम, जि. वाशिम असे आदेश महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड मंडळ औरंगाबाद यांनी तहसीलदार वाशिम, विभागीय वक्फ अधिकारी कार्यालयालय अमरावती यांना केले. यावरुन तहसीलदार वाशिम यांनी अनसिंग तलाठी यांना आदेशित करीत अनसिंग येथील गट नं. ३६३ मधील १.०० जमीनीमध्ये दर्शविलेले अर्शद सिद्दिकी म. कलीम सिद्दीकी व प्रणय देविदत्त शुक्ला यांची नांवे भोगवटदाराच्या रकान्यातुन कमी करुन त्यामध्ये हजरत मोहम्मद हनिफ मस्तान रहेमान सैलानी अनसिंग ता. जि.वाशिम या संस्थेचे नांव भोगवटदार आधोरेखित झाले. या प्रक्रियेसाठी शेख जहीर शेख खालीक रा. बुलडाणा यांनीही तहसिलदार वाशिम यांना मालकी हक्क रद्द करून हजरत मोहम्मद हनीफ रहेमान सैलानी अनसिंग ता. जि. वाशिम अशी नोंद करावी असे तक्रार अर्ज केले होते. यांच्या तक्रारीची दखल घेत वरील आदेश दिले.
तरीही मोहम्मद अशफाक मोहम्मद जुसफ रा. बुलडाणा व प्रणयदत्त देविदत्त शुक्ला रा. इंदौर, मध्यप्रदेश यांनी वक्फ बोर्डच्या योजनेसाठी फाईल दाखल केली होती. त्यासोबतच हजरत मोहम्मद हनिफ मस्तान रहेमान सैलानी अनसिंग ता. जि. वाशिम ट्रस्टचे देखरेख करणारे स्थानिक शब्बीर हुसैन मोहम्मद हुसैन रा. अनसिंग ता. जि. वाशिम, स्थानिक इतर नागरिक यांनीही योजनेची फाईल दाखल केली होती. परंतु काही तरी चिरीमिरी करून वक्फ बोर्ड औरंगाबाद येथील बाबू आसिफ मुतवल्ली यांनी जिल्हाबाहेर राहणारे मोहम्मद अशफाक मोहम्मद जुसफ रा. बुलडाणा, प्रनयदत्त देवीदत्त शुक्ला रा. इंदौर मध्यप्रदेश यांना वक्फ बोर्ड औरंगाबाद योजनेसाठी फाईल मंजूर केली.
हजरत मोहम्मद हनिफ मस्तान रहेमान सैलानी यांचे हयातीपासून सोबत असणारे अनसिंग येथील रहिवासी शब्बीर हुसैन मोहम्मद हुसैन, शेख जहीर शेख खालीक रा. बुलडाणा ता. जि. बुलडाणा यांच्या योजनेची फाईल औरंगाबाद वक्फ बोर्ड कार्यालयातूनच गायब करुन सोबतच त्यांच्याकडे ३५०० रुपयांची पावती (फाईल जमा केल्याची पावती) देखील आहे. तरीही फाईलच दाखल नाही असे दाखविण्यात आले. यावरुन वक्फ बोर्ड औरंगाबाद कार्यालयात किती भोंगळ कारभार आहे हे यावरून दिसून येत आहे. त्यांच्यासोबत अनसिंग येथील स्थानिक नागरिक तसेच हजरत मोहम्मद हनिफ मस्तान रहेमान सैलानी यांचे हयातीपासून दरगाहचा सांभाळ करणारे व्यक्ती नामे शब्बीर हुसैन मोहम्मद हुसैन, मोहम्मद निजाम मोहम्मद हनीफ, अंसार मोहम्मद जमील मोहम्मद, अय्युब खान याकुब खान, रवि कुमार तुळशिराम वसीता, नुर मोहम्मद महेबुब खान हे आहेत. तसेच योजनेची फाईल मंजूरी करण्यासाठी त्या स्थानिक जागेचा पंचनाम करतांना विभागीय अधिकारी खुसरो खान यांनी वरील लोकांच्या उपस्थितीमध्ये स्थळ पंचनामा करुन सदर पंचनाम्यामध्ये स्पष्ट नमुद केलेला आहे की, शब्बीर हुसैन मोहम्मद हुसैन हे दर्गाची पाहणी करीत आहे. तरी देखील वक्फ बोर्ड येथील दाखल करण्यात आलेला पंचनाम व त्यासोबत जोडलेले दस्ताऐवज दाबुन अनिस शेख व आसिफ मुतवल्लीने शासनाची दिशाभुल करुन व स्थानिक लोकांची योजना दाबून दुसऱ्या जिल्ह्याचे लोकांकडून चिरी-मिरी घेवून त्यांची योजना मंजूर केल्याचे दिसून येत आहे. तरी ही मंजूर केलेली योजनेची स्किम रद्द करुन नव्याने तपास करुन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षापासून या भ्रष्ट अधिकारी विरोधात लढा लढत असून आजपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही. तरी वरिष्ठ अधिकारी यांनी अर्जासोबत जोडलेले दस्तऐवज तपासून योग्य ते निर्णय द्यावा, जेणे करून आमच्यावरील अन्याय दूर होईल, अशी मागणी या दस्ताऐवज सादर करुन करीत आहे.
दरम्यान योजना मिळावी यासाठी महाराष्ट्राचे कॅबीनेट मंत्री व कायदा न्याय मंत्री धनंजय मुंढे, राज्यसभेचे सदस्य डॉ. फौजीया खान तसेच वक्फ बोर्डच्या सदस्य, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील, आमदार राजेश एकडे या सर्वांच्या शिफारश पत्र देऊनही ते दाबून ठेवून मला योजनेपासून वंचित ठेवले. तरी सर्व बाबींबवर विनंती पुर्वक विचार करून न्याय मिळावा, असेही तक्रार निवेदनात नमूद आहे.