जिजाऊ ज्ञान मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी

जिजाऊ ज्ञान मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी 
धाड : (एशिया मंच न्युज)
     म्हसला खुर्द (धाड) येथील जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल & सायन्स व क्रॉप सायन्स कॉलेजमध्ये ७ जुलै रोजी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
 
       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सचिन इंगळे होते. मान्यवरांच्या हस्ते पांडुरंगाच्या पालखीचे दीप प्रज्वलन करीत व पुष्प अर्पण करुन पूजन करण्यात आले. प्राचार्य इंगळे यांनी आपल्या भाषणात आषाढी एकादशी का साजरी केली जाते व आषाढी एकादशीचे वारकरी संप्रदायामध्ये काय महत्त्व आहे हे पटवून दिले. वारकरी संप्रदाय व पांडुरंगाची भक्तीची महती सांगितली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुख्मिनीची वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधले. सूत्रसंचालन शिक्षिका साखरे यांनी तर शिक्षिका जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.