भगवान वीर एकलव्य जयंतीची बैठक * एकलव्य जयंतीच्या अध्यक्षपदी उमेश बरडे यांची निवड

भगवान वीर एकलव्य जयंतीची बैठक
 * एकलव्य जयंतीच्या अध्यक्षपदी उमेश बरडे यांची निवड
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकलव्य महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे ठरले आहे, त्या अनुषंगाने बुलढाणा येथे स्थानिक भीलवाडा येथे 19 जुलै रोजी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

        या बैठकीला माजी नगरसेवक कैलास माळी, आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ डाबेराव, एकलव्य संघटनेचे प्रदेश सचिव मधुकर पवार, आदिवासी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू टारपे यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सदर बैठकीला भीलवाड्यातील आदिवासी भिल समाजातील तरुण वर्गाची मोठ्या संख्यने उपस्थिती होती. या दरम्यान जयंती निमित्त बैठकीमध्ये सर्वानुमते उमेश बरडे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सतीश रतन मोरे, दीपक सुरेश पिंगळे, आदित्य विक्रम मोरे, उमेश ठाकरे यांची तर सचिव पदी चंद्रकांत बरडे, सहसचिव पदी अल्केश टारपे, कोषाध्यक्षपदी लखन मामा ठाकरे यांची निवड करण्यात आली.

      सदस्यपदी विजय मोरे, नितीन पिंपळे, मंगल ठाकरे, राहुल मोरे, अनिल बरडे, अनिल मोरे, अजय पिंपळे, विजय बरडे, सुनील मोरे आदींची नियुक्ती करण्यात आली. या सामाजिक बैठकीत भगवान वीर एकलव्य यांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्याचे एकमताने ठराव पारित करण्यात आले.
       जागतिक आदिवासी दिन हा संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जातो. याच जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्य साधून बुलढाणा येथील भीलवाड्यात (भिल्लठाणा) राहणाऱ्या  तरुणांनी मागील नऊ वर्षापासून वीर एकलव्य महाराजांची जयंती साजरी करीत आहे. यावेळी विर एकलव्य जयंतीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर, विविध देखावे, आदिवासी वेशभूषा, आदिवासी पारंपारिक नृत्य हे सुद्धा सादर करण्यात आले आहे. या बैठकीला भीलवाड्यातील असंख्य तरुण मंडळीची उपस्थिती होती.