आ. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा बुलढाण्यात निषेध * ख्रिश्चन समाज बांधवाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

आ. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा बुलढाण्यात निषेध 
* ख्रिश्चन समाज बांधवाचा  जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        भारतीय जनता पार्टीचे  आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात ख्रिस्ती समाज बांधवांच्या वतीने  बुलढाणा  येथे १० जुलै रोजी निषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 

यावेळी भाजपा पक्षश्रेष्ठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यसक्ष रवींद्र चव्हाण यांनी आ. पडळकर यांना योग्य ती समज द्यावी, त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.शहरातील चर्च ऑफ नाझरीन येथून या मोर्चाला शांततेत प्रारंभ झाला. 

      यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यात आला. या संदर्भात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किरण पाटील यांना निवेदन सादर केले. या मोर्चात बुलढाणा शहरासह, जिल्ह्यातील शेकडो समाज बांधव, ख्रिस्ती धर्मगुरु सहभागी झाले होते. मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. 

      यावेळी पडळकर यांची आमदारकी रद्द करा, पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, ख्रिस्ती समाजाविषयी वक्तव्य बंद करा, संविधानाचे रक्षण करू, सर्व धर्म समभावाने जतन करू अशा प्रकारचे फलक दिसत होते. सदर निषेध मोर्चा रेवरंड विजय पलघामोल, सुहास गुर्जर, बोरघाटे, सोनारे, गायकवाड, बाबुराव डोंगरदिवे, पास्टर हर्षनंद डोंगरदिवे, बोरकर, जगदीश शिंदे, पाटोळे, खंडारे, कांबळे यांच्या मार्गदर्शनात हा मोर्चा काढण्यात आला.